मंडणगड बाजारपेठेतील संगणकाच्या दुकानाला आग

मंडणगड बाजारपेठेतील संगणकाच्या दुकानाला आग
Published on

-Rat१p२०.jpg -
P२५N८१४७७
मंडणगड : बाजारपेठेत दुकानास लागलेली आग आटोक्यात आणताना नगरपंचायत कर्मचारी व स्थानिक नागरिक.
---
मंडणगडातील संगणक दुकानाला आग
शॉर्टसर्किटचा अंदाज; ग्रामस्थ, नगरपंचायत कर्मचाऱ्यांमुळे वेळीच आटोक्यात
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः मंडणगड शहरातील बाणकोट रोड बाजारपेठेतील अमित कॉम्प्युटर्स या संगणक दुरुस्तीच्या दुकानाला शुक्रवारी (ता. १) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. आग अटोक्यात आणण्यात नागरिक व नगरपंचायत प्रशासनास यश आले.
दुकानाचे मालक सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आले. दिवाबत्ती करून दुकान बंद करून आपल्या कामास निघून गेले. काही वेळाने दुकानातून धूर येत असल्याचे जवळच्या दुकानदारांनी अमित गुजर यांना फोन करून तातडीने दुकानात येण्यासाठी सांगितले. तेही बाजारातच असल्याने तातडीने दुकानात आले. नगरपंचायतीस आगीचे वृत्त कळवताच तातडीने मुख्याधिकारी अभिजित कुंभार व सर्व कर्मचारी अग्निशमन यंत्रणेसह घटनास्थळी हजर झाले. परिसरातील गोळा झालेले नागरिक व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दुकानाचा दरवाजा उघडून आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. परिसरातून पाणी आणून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन यंत्रणेतील गॅसचा फवाराही मारण्यात आला. दिवसा आग लागल्याने शहरातील मोठी दुर्घटना टळली. कारण, या परिसरात दाटीवाटीने अनेक दुकाने आहेत. नगरपंचायत व परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग पसरली नाही. मुख्याधिकारी कुंभार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुकानातील विद्युततारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत महसूल यंत्रणेला सांगण्यात आले आहे. दुकानाचे मालक अमित गुजर यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
---
नुकसानीचा पंचनामा
मंडणगड शहरातील संगणक दुकानाला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामानाही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com