सर्वेक्षणचा उपयोग व्यवसायासाठी करा

सर्वेक्षणचा उपयोग व्यवसायासाठी करा
Published on

‘सर्वेक्षण’चा उपयोग
व्यवसायासाठी करा’
रत्नागिरी ः ग्रामीण संसाधन सर्वेक्षण व सामाजिक संशोधन तंत्र सर्वेक्षण हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात व्यावसायिक जीवनाचा मार्ग म्हणून करावा, असे प्रतिपादन कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व भूगोल विभागामार्फत अभ्यासक्रमाचे ५७ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्या वेळी डॉ. आठल्ये बोलत होत्या. नव्या शैक्षणिक उद्दिष्टांनुसार, विद्यार्थी बहुआयामी आणि बहुकौशल्ययुक्त व्हावेत, विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच ज्ञानाचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने कार्यक्रमाच्या या अभ्यासक्रमाचे आयोजन केले. समन्वयक प्रा. सचिन सनगरे यांनी विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रमामधील उपक्रमाचे चलचित्र सादर केले. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

माखजनमध्ये गणेशमूर्ती
शाळांमध्ये लगबग
संगमेश्वर ः अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माखजन परिसरातील गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. मूर्तिकार सध्या रंगरंगोटीत मग्न आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध रूपातील बाप्पा कारखान्यांमध्ये साकारला जात आहे. माखजन, आरवली परिसरामध्ये सुमारे १० गणेशमूर्ती कारखाने असून, परिसरात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

ताम्हाणे शाळेत
नाचणी लावणी महोत्सव
संगमेश्वर ः विद्यार्थांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी आणि पुढील पिढी शेतीकडे वळावी, या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे शाळेच्यावतीने नाचणी, वरी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी नाचणी, वरी, हरिक यांची रोपे लावून शेतीकामाचा आनंद आणि अनुभव घेतला. शिक्षकांनीही या वेळी विद्यार्थ्यांना शेतीबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच अमर सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिलकुमार गायकर, मुख्याध्यपिका पवार, शिक्षिका जाधव, संतोष कुळये, मनोज जाधव, कृषी सखी व ग्रामपंचायत सदस्य दर्शना शिगवण, उद्योगसखी अनुजा सावंत व पालक उपस्थित होते.

संगमेश्वर-देवरूख मार्ग खड्डेमय
संगमेश्वर ः संगमेश्वर ते देवरूखदरम्यानचा डांबरी रस्ता खड्डेमय झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. प्रशासनाने तब्बल ३२ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम हाती घेतले होते; मात्र काही वर्षानंतर रस्ता पुन्हा उखडायला लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या रस्त्यावरील खड्डे तीनवेळा भरूनही ते पुन्हा पहिल्यापेक्षा मोठे पडले आहेत. विशेष म्हणजे, या खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी चिरेखाणीतील जाभ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. रस्त्यावर सर्वाधिक खड्डे हे बुरंबी, मयूरबाग, लोवले, नवनिर्माण महाविद्यालय परिसरात असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com