
-rat१p२१.jpg-
२५N८१४७८
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते.
-----
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी
मराठा भवन येथे आयोजन ; अनिकेत रेडीज उपविजेता, ९२ स्पर्धक सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजेता ठरला. सात फेऱ्यांच्या साखळी पद्धतीने खेळवली गेलेली ही स्पर्धा अनिकेत रेडीज व सौरीश कशेळकर यांनी साडेसहा गुण मिळवत अपराजित राहून गाजवली. सरस टायब्रेकच्या आधारे सौरीशने बाजी मारली व अनिकेतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मराठा भवन हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेत आर्यन धुळप याने सहा गुण मिळवत दमदार खेळाचे प्रदर्शन केले तसेच चिपळूणच्या श्रीहास नारकर व रत्नागिरीच्या लवेश पावसकर यांनी देखील साडेपाच गुण मिळवत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. त्यांना अनुक्रमे तिसरे ते पाचवे पारितोषिक मिळाले. उद्घाटनाला सीए दीपाली पाध्ये, उज्ज्वला क्लासेसचे मुख्य संचालक सीएस पुरुषोत्तम पाध्ये, सीए शरदचंद्र वझे उपस्थित होते. स्पर्धेत ९२ स्पर्धकांनी भाग घेतला व त्यातील १५ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय फिडे मानांकनप्राप्त खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून उज्ज्वला क्लासेसतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
बक्षीस समारंभाला सीए कपिल लिमये, सीए शरदचंद्र वझे, सीए दीपाली पाध्ये व सीएस पुरुषोत्तम पाध्ये उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला क्लासेसच्या कर्मचारी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
चौकट १
विस्तृत निकाल
खुला गट : सौरिश कशेळकर, अनिकेत रेडिज, आर्यन धुळप, श्रीहास नारकर, लवेश पावसकर, अनंत गोखले, निधी मुळ्ये, कौस्तुभ हर्डीकर, प्रवीण सावर्डेकर, साईप्रसाद साळवी; १६-३५ वयोगट : शुभंकर सावंत, ३६-५५ वयोगट : राकेश जुवेकर, वरिष्ठ खेळाडू : सुनील शिंदे, महिला खेळाडू : सई प्रभुदेसाई. १५ वर्षाखालील मुले : बावधनकर शुभम, अर्णव सासवडे, विपिन सावंत; १५ वर्षाखालील मुली : तनया आंब्रे, सानवी दामले, पद्मश्री वैद्य; १२ वर्षाखालील मुले : राघव पाध्ये, आयुष अमेय रायकर, अलिक गांगुली, १२ वर्षाखालील मुली : ईश्वरी आनंद सप्रे, साची चाळके, साफिया कापडी; ९ वर्षाखालील मुले : विहंग अक्षय सावंत, अर्णव गावखडकर, कपेश माईणकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.