नाना शंकरशेट यांना अभिवादन
-rat१p२४.jpg-
P२५N८१४८१
रत्नागिरी : दैवज्ञ पतसंस्थेत जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना विजय पेडणेकर, अनिल उपळेकर, आनंद वीरकर व अन्य.
-----
नाना शंकरशेठ यांना अभिवादन
दैवज्ञ पतसंस्थेत ; कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी, ता. १ : शहरातील दैवज्ञ सहकारी पतसंस्थेत हिंदुस्थानचे विकासपुरुष, शिक्षणतज्ज्ञ, थोर समाजसुधारक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना १६०व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ व पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अनिल उपळेकर, उद्योगपती आनंद वीरकर, महेश खेडेकर, पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दैवज्ञ पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. नानांच्या कार्याचा गौरव केला. या वेळी सचिव रत्ना आचरेकर, संचालिका अंजली पेडणेकर, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.