शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी जोशी यांचे योगदान अमूल्य
-rat१p३०.jpg-
२५N८१५२५
रत्नागिरी : मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचा सत्कार करताना पालकमंत्री उदय सामंत. डावीकडून सतीश शेवडे, राजेश मुकादम, मुकुंद जोशी, सरपंच अमर रहाटे.
-------
शैक्षणिक विकासासाठी जोशी यांचे
योगदान अमूल्य ः उदय सामंत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : धामणसे हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांचे भगव्याशी नातं हे जिव्हाळ्याचं आणि निष्ठेचं आहे. आता निवृत्तीनंतर त्यांचा समाजसेवेचा टप्पा सुरू होत आहे. गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक अविनाश जोशी यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात मंत्री सामंत बोलत होते. या वेळी सामंत यांच्या हस्ते जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऋणानुबंध या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आले.
अविनाश जोशी व सौ. अपर्णा जोशी या दाम्पत्याचा धामणसे परिसरातून विविध संस्था, विद्यालय, गावातील विविध संस्था, माजी विद्यार्थी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी जोशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. सरपंच आणि माजी विद्यार्थी अमर रहाटे यांनी जोशी यांचा प्रभाव आणि धामणसे हायस्कूल टिकून राहावे यासाठी पालकांसोबतच माजी विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करावेत असे सांगितले.
कार्यक्रमाला उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, संस्थाध्यक्ष मुकुंद जोशी, सचिव विलास पांचाळ, खजिनदार विश्वास धनावडे, सतीश शेवडे, राजेश मुकादम, अॅड. दीपक पटवर्धन, नथुराम पांचाळ, शैलेश पुजारी, अरुण जाधव, प्राचार्य शोभा खोत, अरुण पेडणेकर, नूतन मुख्याध्यापक उपस्थित होते.
चौकट १
खुमासदार किस्से
श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी जोशी यांचे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. त्यांचे किस्से, जोशी यांनी सरपंचपदाची निवडणूक लढवली त्या वेळेला आलेले अनुभव आणि त्यांनी गावात अनेक सामाजिक कामांसाठी केलेली मदत यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.