सर्वसामान्यांची कामे विनासायास करा

सर्वसामान्यांची कामे विनासायास करा

Published on

81669
81694


सर्वसामान्यांची कामे विनासायास करा

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी; मुख्यालयात महसूल दिनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असतो. महसूल हा महाराष्ट्र शासनाचा, प्रशासनाचा कणा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना येथे विविध सेवा दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांची विनासायास व कमीत कमी कष्टामध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सामान्य नागरिकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. १) आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी. एम. विश्वकर्मा जिल्हा स्तरीय समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील यांनी, जमिनीचे अभिलेख तयार करणे, अद्ययावत ठेवणे, सातबारा अद्ययावत ठेवणे व नागरिकांना सहजरित्या उपलब्ध करून देणे, हे महसूल विभागाचे प्रमुख कार्य आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम केल्यास ते तणावमुक्त होते. शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सीईओ खेबुडकर यांनी, आपल्या कामातून सामान्य नागरिकांना लाभ झाला पाहिजे, हा दृष्टीकोन अधिकाऱ्यांनी ठेवावा. आपण केलेल्या कामाचे परीक्षण होणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे चुका टाळल्या जाऊ शकतात. आपल्या कामांतून सामान्य घटकांना न्याय देण्याचे काम करावे, असे सांगितले. नयोमी साटम यांनी महसूल विभागाची व्याप्ती वाढल्याचे सांगून याद्वारे नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले. हा विभाग शासनाच्या प्रत्येक योजना, उपक्रम राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे शुभांगी साठे म्हणाल्या.
मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत नागरिकांच्या समस्या सोडविणे आवश्यक असल्याचे सांगितले. महसूल विभागातील अधिकारी कामाच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देत असतात, असे गौरवोद्गार प्रभाकर सावंत यांनी काढले.
....................
विविध दाखल्यांचे वाटप
महसूल दिनानिमित्त विविध दाखले वितरण आणि विशेष सहाय आर्थिक योजनेअंतर्गत लाभ वाटप कार्यक्रम तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा देखील यावेळी पार पडला. प्रधानमंत्री जनजाती आधिवासी न्याय महाअभियानांतर्गत घरकुल योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील दाभाळे येथील गणपत शिवराम पवार यांना घरकुल बांधणेसाठी सौंदाळे (ता. देवगड) येथील ०.५० आर. जागा मंजुरीच्या आदेशाचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केले.
--
उत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांचा गौरव
महसूल विभागातील चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी असे ः आरती देसाई (उपजिल्हाधिकारी भूसंपादन), जगदीश कातकर (कणकवली उपविभागीय अधिकारी), शीतल जाधव (तहसीलदार पुनर्वसन), श्रीधर पाटील (सावंतवाडी तहसीलदार), राजश्री सामंत (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी), रईस पटेल (जिल्हा विधी अधिकारी), शिवाजी राठोड (महसूल नायब तहसीलदार), प्रज्ञा राजमाने (निवासी नायब तहसलीदार, दोडामार्ग), विठोबा सावंत (जिल्हाधिकारी कार्यालय लघुलेखक), अनिल पवार, सर्जेराव राणे (दोन्ही सहायक महसूल अधिकारी) यांच्यासह नीलिमा सावंत, शरद शिरसाट, प्रीतम माळी, अमोल पाटील, अनिल गावडे, बाळकृष्ण रणसिंग, मारोती ओंबासे, पंढरीनाथ गोसावी, दिलीप चव्हाण, शंकर रावले, सुभाष जाधव, दिलीप राणे, प्रकाश शिंदे, श्रीमती सफीया नावळेकर, श्रीमती अंजनी चव्हाण, उदेश जाधव, सोनिया आंगणे, श्रीमती भावना चव्हाण, तानाजी बाजारी, बापू परब, श्रीमती कीर्ती मसुरकर, मनोहर हिंदळेकर, मंदार पावसकर, गोपाळ हळदणकर, भाग्यश्री बावकर, संचिता नाईक. अशोक नेवगी, प्रथमेश कानसे, गंगाराम जंगले यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com