
-rat२p१४.jpg-
२५N८१६७६
पावस ः शिवार आंबेरे येथील पेजे महाविद्यालयामध्ये आयोजित निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी.
---
पेजे महाविद्यालयात वक्तृत्व, निबंध स्पर्धा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील पेजे महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित भाषिक कौशल्याचे उपयोजन या विषयावर आधारित कथाकथन कौशल्याचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सृष्टी तेरवणकरने प्रथम, सुजल तरळ द्वितीय, दिप्तेश कुळयेने तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये गौरी भोसले, सृष्टी तेरवणकर, सुजल तरळ, विज्ञान निबंध स्पर्धेमध्ये दीक्षा जाधव, आकांक्षा कुळ्ये, सानिका पोतकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
चिपळूण वैश्य समाजातर्फे १७ ला गुणगौरव
चिपळूण : चिपळूण वैश्य समाजातर्फे दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या तसेच विविध शाखांतील पदवीधर असणाऱ्या समाजातील शहरातील विद्यार्थ्यांचा सन्मान १७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या राधाताई लाड सभागृहात करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्यासाठी गुणपत्रके (छायांकित प्रत) संस्थेकडे जमा करावीत, असे आवाहन चिपळूण वैश्य समाजाचे अध्यक्ष पंकज कोळवणकर यांनी केले आहे.
चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा
चिपळूण : ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा संघाच्या कार्यालयात अध्यक्ष उस्मान बांगी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी उपाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव रत्नमाला कळंबटे आणि कोषाध्यक्ष विजय बापट उपस्थित होते. हिरकणी पुरस्कार मिळालेल्या नाझिमा सकवारे यांचा संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. माधवी भागवत यांनी सावित्रीबाई फुले यांची तसबीर नाझिमा यांना भेट म्हणून दिली. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करून आणि नंतर केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.