लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी नितीन कुलकर्णी

लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी नितीन कुलकर्णी

Published on

‘लायन्स’न्यू रत्नागिरीच्या
अध्यक्षपदी कुलकर्णी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : समाजसेवा हे आकर्षण म्हणून नव्हे तर आत्मिक प्रेरणेने केली पाहिजे ज्यांना समाजासाठी वेळ आणि साधनं द्यायची तयारी आहे, अशा लोकांनीच लायन्स क्लबमध्ये यावे, असा स्पष्ट संदेश जगदीश पुरोहित यांनी दिला. लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या २०२५-२६ या कार्यकालासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते.
हा सोहळा रत्नागिरी येथील हॉटेल कार्निव्हल येथे झाला. या वेळी एमजेएफ पराग पानवलकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन, प्रवीण मलुष्टे, जयंत जोशी आदी उपस्थित होते. जगदीश पुरोहित म्हणाले, समाजसेवेचा खरा अर्थ समजून घेणारे, आपल्या कुटुंब व व्यवसायातून वेळ काढणारे आणि समाजाला काहीतरी परत देण्याची खरी भावना बाळगणारे लोकांनीच लायन्स क्लबमध्ये यावे. केवळ प्रतिष्ठेसाठी किंवा ओढूनताणून कोणीही चांगला समाजसेवक होऊ शकत नाही. या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी नितीन कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. सचिव म्हणून धनश्री पालांडे आणि खजिनदार म्हणून अभिजित पंडित यांनी शपथ घेतली. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून प्रथमेश गायकवाड, द्वितीय उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सहसचिव प्रदीप मोरे, जनसंपर्क अधिकारी वैभव पाटील, सूर्यकांत जाधव आणि भक्ती गायकवाड यांचा समावेश आहे. नवीन संचालक मंडळात रश्मी मलुष्टे, जयश्री जोशी, अमित पटेल, जितेंद्र पटेल, हितेश पटेल, नीलेश पटेल, वसंत पटेल, दर्शन पवार, जानव्ही पवार, निवृत्ती खरवटकर आणि वृषभ खरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com