उपकेंद्राची जबाबदारी वाढली
-rat२p२७.jpg-
P२५N८१७०२
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या स्थापनादिन सोहळ्यात शनिवारी बोलताना डॉ. दिनकर मराठे. सोबत प्रमोद कोनकर, डॉ. शशांक पाटील.
--------
संस्कृत अध्ययन केंद्र अधिक विस्तृत कार्य करेल
डॉ. दिनकर मराठे ः योगासन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र स्थापन होऊन चार वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली असली तरी आता जबाबदारी अधिक वाढली आहे. रत्नागिरीकरांसाठी येत्या काळात संस्कृत, योग यांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. रत्नागिरीत उपकेंद्राचे नेहमीच स्वागत झाले, सहकार्य मिळाले त्यामुळे यापुढे हे केंद्र अधिक विस्तृत कार्य करेल, असे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.
उपकेंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. शशांक पाटील उपस्थित होते. उपकेंद्रातील कर्मचारी प्रथमेश घोसाळे, करण कीर, अपर्णा कोकरे, साक्षी भाटकर व राज्यस्तरावरील योगासन स्पर्धेसाठी निवड झालेल्या मानसी यमगर, पूर्वा पावसकर, महादेव काळे, अपूर्वा मुसळे यांना गौरवले तसेच पत्रकार-छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचाही सत्कार डॉ. मराठे यांनी केला.
या प्रसंगी कोनकर यांनी सांगितले की, संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपण संस्कृती आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच आचरणात आणतो. आपण संस्कृत भाषेसोबतच संस्कृती जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्याकडील ज्ञान हे समाजापर्यंत नेणे गरजेचे आहे. समन्वयक स्वरूप काणे यांनी तयार केलेली रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राची ४ वर्षांच्या कामगिरीची चित्रफीत दाखवण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.