थोरांचे विचार तरुणांसाठी मार्गदर्शक

थोरांचे विचार तरुणांसाठी मार्गदर्शक

Published on

82076

थोरांचे विचार तरुणांसाठी मार्गदर्शक
प्रा. डी. बी. गोस्वामीः वेंगुर्लेत टिळक, साठे, ब. खर्डेकरांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ः बॅ. खर्डेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या साहित्यातून हेच जाणवते की, आजचा समाज हा सुशिक्षित आहे; परंतु सुसंस्कृत झालेला नाही. या महनीयांच्या कार्याला समजून घेऊन समाजकार्य, समाजऋण व देशसेवा या गोष्टींची जोपासना आजच्या तरुणाईमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी केले.
येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय, कनिष्ठ व वरिष्ठ सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने बॅ. खर्डेकर जयंती व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांची पुण्यतिथी असा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी वासुदेव नाईक, प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी, माजी विद्यार्थी बापू गिरप, डॉ. एस. एस. भिसे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक प्रा. डी. जे. शितोळे, प्रा. पी. जी. देसाई आदी उपस्थित होते.
डॉ. भिसे यांनी मनोगतामध्ये बॅ. खर्डेकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला. त्यांनी समाजाप्रती केलेल्या अतुलनीय योगदानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतात बॅ. खर्डेकर, लोकशाहीर साठे व लोकमान्य टिळक यांचा जीवनपट उलगडला. श्री. गिरप यांनी बॅ. खर्डेकर यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा. आर. के. हराळे यांनी केले. आभार प्रा. देसाई यांनी मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com