कोकण
राजेंद्र कसबे यांचा सत्कार
महसूल साहाय्यक
कसबे यांचा सत्कार
खेड, ता. ५ : येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयातर्फे महसूलदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल साहाय्यक राजेंद्र शिवाजी कसबे यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
खेड शहराजवळील भरणे येथील काळकाई मंदिराच्या सभागृहात महसूल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यासह सर्व कर्माचारी उपस्थित होते. महसूल साहाय्यक राजेंद्र कसबे यांनी २०२४-२०२५ या महसूल वर्षामध्ये खेड विभागातील महसूल विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.