मनसे आक्रमक

मनसे आक्रमक

Published on

एसटी प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ५ ः देवरुख-संगमेश्वर मार्गावर आपल्या वाहनाने प्रवास करत असताना ट्रकला बाजू काढून पुढे जाण्याच्या प्रयत्नात एसटीचा ताबा सुटला. ही गाडी समोरून येणाऱ्या वाहनावर आदळणार होती. मात्र समोरील वाहनचालकाने गाडी गटारात उतरवल्याने दुर्घटना टळली. मात्र आठ दिवसात असा प्रसंग दोनवेळा घडल्याने मनसे व इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत.
घाटाचा अंदाज येत नसल्याने असे वारंवार अपघात होत आहेत. मनसेने आक्रमक होत देवरुख आगार प्रशासनाला धारेवर धरले. चालक व वाहक यांना प्रशिक्षण शिबिर घेऊन मगच बसेस चालवण्यासाठी देण्यात यावे असे सांगितले. ही बस १५ वर्षाहून अधिक झाली असूनही चालवली जात आहे. मनसेच्या आक्रमकतेमुळे ही बस वाहतुकीतून काढण्यास सांगण्यात आले. या वेळी मनसे देवरुख शहराध्यक्ष सागर संसारे, माजी नगरसेवक अनुराग कोचिरकर, आकार ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष नीलेश चव्हाण, विभाग अध्यक्ष अक्षय झेपले, पंकज संसारे, सागर चव्हाण, अतिष बंदरकर, वेदांत शेट्ये आदी उपस्थित होते.
---

Marathi News Esakal
www.esakal.com