अनिकेत रेडीज् अजिंक्य

अनिकेत रेडीज् अजिंक्य

Published on

- rat४p१४.jpg-
२५N८२०८६
रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था आयोजित जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसह संस्थेचे पदाधिकारी.
---
जिल्हास्तरीय बुद्धिबळमध्ये अनिकेत अजिंक्य
राधाकृष्ण मंदिर संस्थेतर्फे आयोजन ; यश गोगटेला दूसरे स्थान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या सहाव्या मानांकित अनिकेत रेडीज याने पटकावले. श्री राधाकृष्ण मंदिरात या स्पर्धा झाल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीतील डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या अनिकेतने साईप्रसाद साळवीवर मात करत एकूण ७ फेऱ्यांअखेर ६.५ गुणांसह प्रथम स्थान पटकावले.
प्रत्येकी ६ गुणांसह यश गोगटे (रत्नागिरी), साहस नारकर (चिपळूण) व मिलिंद नरवणकर (घरडा केमिकल्स) यांनी स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ स्थान प्राप्त केले. अंतिम फेरीतील काही महत्वाचे निकाल असे: यश गोगटे विजयी विरुद्ध प्रवीण सावर्डेकर, मिलिंद नरवणकर विजयी विरुद्ध आर्यन धुळप, साहस नारकर विजयी विरुद्ध सिद्धेश मदने. तत्पूर्वी सहाव्या फेरीतील एका उत्कंठावर्धक डावात साईप्रसाद साळवी याने प्रथम मानांकित सौरिष कशेळकरचा पराभव केला.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेचे उद्‍घाटन नीलेश मलुष्टे, मिलिंद दळी, राजेश रेडीज, समीर कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्ह्यातून २२ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटूंसह एकूण १२० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेचे नियोजन व मुख्य पंच कामगिरी विवेक सोहनी यांनी पार पाडली. साहाय्यक पंच म्हणून लांजा येथील प्राची मयेकर, चैतन्य भिडे यांनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल असा ः
खुला गट क्रमांक पाच ते पंधरा : सौरिश कशेळकर, साळवी साईप्रसाद, अनंत गोखले, माधव काणे, आर्यन धुळप, प्रवीण सावर्डेकर, सोहम रुमडे , सिद्धेश मदने, विवेक जोशी, श्रीहास नारकर, सई प्रभुदेसाई. उत्तेजनार्थ पारितोषिके : वयोगट ३६-५५ प्रथम : जितेंद्र पटेल, वयोगट १६-३५ प्रथम : कौस्तुभ हर्डीकर. सर्वोत्तम महिला खेळाडू : निधी मुळ्ये, सर्वोत्तम वरिष्ठ खेळाडू : सुहास कामतेकर. १५ वर्षांखालील गट : मुले - अपूर्व बंडसोडे, मिहीर काणेकर, लवेश पावसकर, मुली - पद्मश्री वैद्य, तनया आंब्रे, गार्गी सावंत. १२ वर्षाखालील गट : मुले - आयुष रायकर, अथर्व साठे, अलिक गांगुली, मुली - राधा पाध्ये, सान्वी सरखोत, आद्या पावसकर, ९ वर्षाखालील गट : मुले - शर्विल शहाणे, आरव निमकर, पारस मुंडेकर.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com