मार्लेश्वर देवस्थानच्या पर्यटन विकासासाठी आंदोलन

मार्लेश्वर देवस्थानच्या पर्यटन विकासासाठी आंदोलन

Published on

८२३०१

मार्लेश्वरच्या पर्यटन विकासासाठी आंदोलन
गावविकास समिती; देवरूख कार्यालयासमोर धरणे
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानचा नियोजनबद्ध पर्यटनविकास करावा, या मागणीसाठी गावविकास समितीतर्फे देवरूख तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर वसलेले मार्लेश्वर हे मंदिर स्थानिकांसह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तिथे वर्षभर हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात; मात्र, त्या परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, शासनाकडूनही ठोस कृती केली जात नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या सहभागाने गावविकास समितीने संघर्षाची भूमिका घेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मार्लेश्वर येथे पर्यटक व भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी मंदिर परिसरात सुसज्ज भक्तनिवास उभारावेत. मार्लेश्वर येथील गुहेकडे जाणारा चढाव वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी अडथळा असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट अथवा सरकता जिना (एस्केलेटर) बसवावा. मंदिर परिसरात स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतिगृह आणि योग्य आरोग्य सुविधांची गरज आहे. धबधबा परिसरात कपडे बदलण्यासाठी वेगळी व्यवस्था धबधब्याजवळ स्नान करणाऱ्या भाविकांसाठी करावी. या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, सरकारने वेळोवेळी आश्वासने दिली होती; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही. पर्यटनवाढीसोबत स्थानिकांना रोजगार मिळू शकतो तसेच सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मार्लेश्वरचा समग्र पर्यटन विकास गरजेचा आहे, असा पवित्रा समितीने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com