गावाच्या गतिमान विकासासाठी ‘सरपंच संवाद’

गावाच्या गतिमान विकासासाठी ‘सरपंच संवाद’

Published on

82310
रवींद्र खेबुडकर


गावाच्या गतिमान विकासासाठी ‘सरपंच संवाद’

‘मोबाईल ॲप’चे लोकार्पण; जिल्ह्यातील सरपंचांना लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी ‘सरपंच संवाद’ हे मोबाईल ॲप लाँच करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना केले आहे.
श्री. खेबुडकर म्हणाले, ‘‘जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते २२ एप्रिलला केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व’ या कार्यक्रमात ‘सरपंच संवाद’ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने हे ॲप विकसित केले आहे.
-----------
ॲपचाचा उद्देश असा
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नविन उपक्रमांची देवाणघेवाण वाढविणे हा आहे. या ॲपच्या माध्यमातून सरपंच आपल्या गावातील उत्तम कामकाज शेअर करू शकतात, देशभरातील इतर गावांतील यशोगाथा पाहू शकतात, विविध विषयांवरील प्रशिक्षण घेऊ शकतात, बातम्यांची माहिती मिळवू शकतात व ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवू शकतात. हे ॲप स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन या दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत करणारे प्रभावी डिजिटल साधन आहे.
-----------
असे करा डाऊनलोड!
Android वापरकर्त्यांसाठी https://play.google.com/store/apps/details०id=com.qci.sarpanch_samvaad ही लिंक आहे. तर iOS वापरकर्त्यांसाठी https://apps.apple.com/in/app/sarpanch-samvaad/id६४५२५५२८०२
box ही लिंक आहे.
-------------
कोट
जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप तत्काळ डाऊनलोड करून त्याचा नियमित व योग्य वापर करावा, जेणेकरून गाव स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com