कोकण
प्रभाकर पंतवालावलकर यांचे निधन
82367
प्रभाकर पंतवालावलकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. ५ ः मळगाव-ब्राह्मणआळी येथील रहिवासी प्रभाकर रामकृष्ण पंतवालावलकर (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (ता. २) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी सालईवाडा येथील गुरुकृपा एजन्सीचे मालक रामकृष्ण पंतवालावलकर, मळगाव बाजारपेठेतील गुरुकृपा हार्डवेअर व इलेक्ट्रिक दुकानाचे मालक महेश पंतवालावलकर यांचे ते वडील होत.
--
82364
सुषमा म्हसकर यांचे निधन
वेंगुर्ले, ता. ५ ः वेंगुर्ले-घाडीवाडा येथील सुषमा देऊ म्हसकर (वय ७८) यांचे सोमवारी (ता. ४) सकाळी ७.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त आरोग्य पर्यवेक्षक (कै.) देऊ शंकर म्हसकर यांच्या त्या पत्नी, पत्रकार उत्तम नाईक, रेडी माजी उपसरपंच दीपक राणे यांच्या सासू होत.