संतसेना नाभिक पतसंस्थेचे १२५ कोटीचे लक्ष्य
संतसेना नाभिक पतसंस्थेचे १२५ कोटींचे लक्ष्य
खेड ः भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवींमध्ये आर्थिक वर्षात ९.४९ कोटींनी वाढ होऊन ५३.९० कोटीच्या ठेवी झाल्याची माहिती पतसंस्थाध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिली. मार्च २०२५ अखेर ६५ लाख ९९ हजार रुपयांचा नफा झाल्याचे स्पष्ट करत चालू आर्थिक वर्षात १२५ कोटींपर्यंत व्यवसायात वाढ करण्याचा मानसही व्यक्त केला. पतसंस्थेची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थाध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सरव्यवस्थापक राजेंद्र मोरे यांनी सभेच्या विषयांचे व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले. पतसंस्थेने ४२ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
खेडमध्ये भात, नाचणीची लागवड पूर्ण
खेड ः गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. भात लावणीची कामेही अंतिम टप्प्यात तालुक्यात आली आहेत. आतापर्यंत ५४०८.७० हेक्टरवर भात-नाचणीची लागवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भात लावणीची कामे उशिरा झाली. जुलै महिन्यात पावसाने सरासरी राखली आहे. यामुळे भात लावणीची कामे जोमात सुरू आहेत. तालुक्यात ५००८.५० हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे, तर ४००.२० हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली आहे.
खेडमध्ये दोघांना बालसंगोपन योजनेचा लाभ
खेड ः शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक मिनार चिखले यांनी खांबतळे येथील दोन गरजूंना शासनदरबारी पाठपुरावा करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. याबाबतचे पत्रक दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, महिला आघाडीच्या शहर संघटिका माधवी बुटाला, माजी नगरसेवक राजेश बुटाला, सतीश चिकणे, प्रज्योत तोडकरी, उपशहरप्रमुख प्रेमळ चिखले, अल्पेश पाटणे, दादू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.