-राजापूर-कुणकेश्वर पदयात्रा उत्साहात
-rat८p२४.jpg-
P२५N८३०५२
राजापूर ः राजापूर ते कुणकेश्वर दर्शन पदयात्रेत सहभागी यात्रेकरी.
-----
राजापूर-कुणकेश्वर पदयात्रा उत्साहात
हर हर महादेव संघटनेतर्फे आयोजन ; ११वे वर्ष, ९० जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः राजापुरातील ‘हर हर महादेव राजापूर’ या संघटनेतर्फे अकराव्या वर्षी राजापूर ते कुणकेश्वर अशा परतीच्या प्रवासासह सुमारे १६०हून अधिक किमीची पदयात्रा केली. श्रावण महिन्यामध्ये आयोजित या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले यात्रेकरी, भाविक यांनी ‘भोलेनाथा’च्या नामाचा जयघोष, नामस्मरण करत पदयात्रेचा प्रवास आनंददायी केला.
जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बावधनकर आणि राजापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उल्हास खडपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा राजापूर जवाहर चौक, कोंडेतढ, डोंगर, सागवे शिरसे, वाडा, देवगडमार्गे कुणकेशवर या मार्गे झाली. परतीच्या प्रवासासह हा प्रवास सुमारे १३-१३५ किलोमीटरचा होता. या पदयात्रेत सुमारे ९० यात्रेकरी सहभागी झाले होते. सर्व पदयात्रींना टीशर्ट तसेच सदरा पायजमा असा आकर्षक पोषाख देण्यात आला होता. सकाळचा फराळ मणचेकर यांनी तर दुपारच्या फराळाची सोय नाणार येथील राम पेडणेकर यांच्या निवासस्थानी करण्यात आली होती. संध्याकाळी वाडा येथील श्रीदेव रवळनाथ मंदिरात मुक्कामाच्या ठिकाणी भोजनव्यवस्था परब गावकार व पप्या वाडेकर यांनी तर कुणकेश्वर येथे भोजन व्यवस्था राकेश तेली यांनी केली.
गेली पाच वर्षे पदयात्रेचे मोफत लाइव्ह प्रक्षेपण करणारे जगन्नाथ गुरव यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सारा वॉटर सप्लायचे सुभाष चव्हाण यांनी मोफत पाणी वाटप केले तसेच वाहन व्यवस्था सागर रहाटे व पर्शुराम खंडे यांनी केली. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
चौकट
संघटनेला पूजेचा मान
श्रीदेव कुणकेश्वर देवस्थानच्यावतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन संघटनेचा सत्कार करण्यात आला व त्या दिवसाचा मानाच्या पूजेचा मान संघटनेला देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.