जिव्हाळा सेवाश्रमास
इन्व्हर्टर, वस्तू प्रदान

जिव्हाळा सेवाश्रमास इन्व्हर्टर, वस्तू प्रदान

Published on

जिव्हाळा सेवाश्रमास
इन्व्हर्टर, वस्तू प्रदान
ओटवणे ः दोन महिन्यांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिव्हाळा आश्रमाला रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानजवळ आश्रमातील आश्रयदात्यांना वीज गेल्यावर काळोखात राहावे लागत असल्याने इन्व्हर्टरची मागणी केली होती. संस्थेच्या रुपा मुद्राळे यांनी ‘सामाजिक बांधिलकी’कडून प्रयत्न केले जातील, असा शब्द दिला होता. त्यासाठी मुद्राळे यांनी प्रयत्न करून न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टकडे प्रस्ताव ठेवला. त्यांनीही त्यासाठी लगेचच होकार दिला. जिव्हाळा सेवा आश्रमाला या ट्रस्टमार्फत इन्व्हर्टर, डायपर व जीवनावश्यक साहित्य अशा ५० हजार रुपये किंमतीच्या वस्तू दिल्या. ट्रस्टचे अध्यक्ष बिर्जे यांनी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट, ख्रिश्चनवाडी माजगाव गरड, सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले. या प्रसंगी ऑगस्तीन फर्नांडिस, इशेद परेरा, मायकल फर्नांडिस, ऋषिकेश नाईक, रुपा मुद्राळे, शरदिनी बागवे व रवी जाधव उपस्थित होते.
------
वर्षावास कार्यक्रम
खोटलेत उत्साहात
मसुरे ः भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा खोटले व पंचशील ट्रस्टतर्फे खोटले गावात वर्षावास कार्यक्रम विविध उपक्रमांनी नुकताच उत्साहात झाला. या कार्यक्रमात मुंबई येथून आलेले भंते प्रज्ञावंत यांनी प्रवचन केले. यावेळी अजगनी येथील संतोष तांबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपासक-उपासिका यांनी भंतेजी यांच्याकडून याचना धम्म समजून घेतला. धम्मदेसना व भोजनदान करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेचे अध्यक्ष संजय खोटलेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कदम, सचिव प्रा. वैभव कदम, अशोक जाधव, राहुल कदम, बौद्धाचार्य शशिकांत कदम, अनंत कदम, रामगड गाव शाखेचे ज्येष्ठ सभासद ज्ञानदेव जाधव, महेश जाधव, तक्षशीला महिला कार्यकारिणीच्या सदस्या स्मिता कदम, अमिता जाधव, आरती कदम, मनाली कदम, रुपाली कदम आदी उपस्थित होते.
.....................
खारेपाटण रोटरीतर्फे
महिलांसाठी ‘देवदर्शन’
खारेपाटण ः खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्यातर्फे खारेपाटणचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते तथा डोंबिवली येथील युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या सौजन्याने श्रावण महिन्याचे औचित्य साधून गुरुवारी (ता. १४) खारेपाटण पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत देवदर्शन वर्षा सहलीचे आयोजन केले आहे. प्रवासादरम्यान नाश्ता व जेवणाची व्यवस्था आहे. पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खारेपाटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com