-गांग्रईतील साकारल्या अनोख्या कलाकृती

-गांग्रईतील साकारल्या अनोख्या कलाकृती

Published on

-rat९p४.jpg-
P२५N८३२२७
गांग्रई येथील कार्यशाळेत कलाकृती काढताना महिला चित्रकार.
-rat९p१३.jpg-
P२५N८३२४०
चिपळूण ः गांग्रई येथे आयोजित कार्यशाळेत साकारलेली कलाकृती.
-----
गांग्रईतील साकारल्या अनोख्या कलाकृती
चित्रकला कार्यशाळेचे उद्‍घाटन ; भारतातील ४५ चित्रकारांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः कोकणातील निसर्गसंपन्न ठिकाण असलेल्या चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथे राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला कार्यशाळेत अनोख्या कलाकृती साकारल्या आहेत. या कार्यशाळेचे उद्‍घाटन माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के व चित्रकार उपस्थित होते.
कार्यशाळेत भारतातील पंजाब, चेन्नई, नागपूर, नाशिक, पुणे, कोकण विभाग, मुंबई, कोल्हापूर, नवी मुंबई आदी भागांतील सुमारे ४५ चित्रकार कलाकार सहभागी आहेत. ही कार्यशाळा १३ ऑगस्टपर्यंत असणार आहे. कोकणातील निसर्गाचे पावसाळ्यातील मनमोहक दृश्य कलाकारांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. गांग्रई येथील विविध ठिकाणांचे प्रत्यक्ष दर्शन व अनुभव घेता यावा यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी कलाकार निसर्गाशी समरस होत आपल्या कलाकृती साकारत आहेत. या कार्यशाळेच्या समारोपानंतर निवडक कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. या प्रदर्शनातून विक्री होणाऱ्या कलाकृतीतील काही रक्कम रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक स्वरूपात देण्यात येणार आहे.

चौकट
सर्व कलाकारांच्या माहितीचा कॅटलॉग
प्रदर्शनानिमित्ताने सर्व कलाकारांच्या माहिती व एका चित्रासह छोटेखानी कॅटलॉग प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या चित्रकारांमध्ये भगवान चव्हाण (चेन्नई), दत्तात्रय पाटोळे (मुंबई), आशुतोष आपटे (पालघर), डी. एस. राणे (मुंबई), नीलेश शिंकक्कर (रत्नागिरी), जावेद मुलाणी (नवी मुंबई), श्वेता उरूणे (इचलकरंजी), नीलेश शहेरकर (नाशिक), डॉ. सौम्या सुरेशकुमार (हैद्राबाद), डॉ. राठे (ठाणे), डॉ. सागर महाजन (मुंबई), चेतन गंगावणे (कुडाळ), प्रवीण मिसाळ (चिपळूण), प्रवीण उठगी (नवी मुंबई), मकरंद राणे (मुंबई), अब्दुल गफार (नागपूर), विवेक लाड (नागपूर), बालाजी भागे (पंजाब), शिवाजी रस्के (कोल्हापूर), संपत नायकवडी (कोल्हापूर), चंद्रकांत प्रजापती (गुजरात), भावेश पटेल (गुजरात), अजय दवळी (कोल्हापूर), राजेंद्रकुमार हंकारे (कोल्हापूर), संदेश मोरे (मुंबई), राजेंद्र महाजन (चोपडा), राखी अरडक (सिंधुदुर्ग), अपर्णा पवार (कराड), रचना नगरकर (मुंबई), अंकिता अस्वले (पनवेल), आकाश सूर्यवंशी (पुणे), प्रणय फराटे (मुंबई), अनुजा कानिटकर (रत्नागिरी), जनार्दन खोत (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com