कुडाळ भाजप मंडलाची जंबो कार्यकारिणी जाहीर

कुडाळ भाजप मंडलाची जंबो कार्यकारिणी जाहीर

Published on

83254

कुडाळ भाजप मंडलाची जंबो कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर तर उपाध्यक्षपदी राजाराम धुरी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः भाजप कुडाळ मंडलची आज ७० जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आज सकाळी भाजप मंडलची सभा संजय वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांना याबाबतची माहिती देण्यात आली.
यामध्ये मंडळ अध्यक्ष-संजय वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष राजाराम धुरी, विजय वारंग, मंगेश प्रभू, राजा प्रभू, महिला उपाध्यक्ष प्रतिभा घावनळकर, सरचिटणीस रुपेश कानडे, योगेश बेळणेकर, चिटणीस भूपेश चेंदवणकर, चंद्रकांत वालावलकर, समाधान परब, प्रमोद गावडे, शेखर गवंडे, उमेश धुरी, महिला चिटणीस प्रज्ञा राणे, आफ्रीन करोल, कोषाध्यक्ष प्रमोद नाईक, एससी मोर्चा अध्यक्ष रणजित रणसिंग, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, किसान मोर्चा अध्यक्ष वैभव शेणई, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जोसेफ डॉन्टस, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजन पांचाळ आदींची निवड करण्यात आली. सदस्यांमध्ये दाजी गोलम, सतीश गावडे, दीपक खरात, वासुदेव भोई, अमित दळवी, अजय डिचोलकर, दीपक काणेकर, प्रमोद दळवी, सचिन घावनळकर, आनंद धुरी, रावजी कदम, नीलेश मेस्त्री, शेखर परब, गणेश गाड, पंढरीनाथ परब, अमोल तेली, प्रमोद गावडे, सुनील बांदेकर, अक्षय तेंडोलकर, प्रशांत तेंडोलकर, महेश भिसे, श्वेता लंगवे, शिल्पा घुर्ये, ममता धुरी, माधवी प्रभू, मुक्ती परब, विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, अक्षता खटावकर, साक्षी सावंत, स्वरा गावडे, साधना परब, सई काळप, अस्मिता शिरपुटे, सुप्रिया मठकर, ज्योती जळवी, शशांक पिंगुळकर, माधवी कानडे, संदेश मठकर, वैभव चेंदवणकर, मनोहर दळवी, सोनाली देसाई, भरत गावडे, अक्षता कुडाळकर आदींचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, भाजप राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, राज्यसभा सदस्य संध्या तेरसे, प्रदेश सदस्य अनिल सावंत, रुपेश कानडे, योगेश बेळणेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष पप्पा तवटे, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील, शहर अध्यक्ष सुनील बांदेकर आदी उपस्थित होते.

चौकट
तीनशे जणांची कार्यकारिणी
या आठवड्यात महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा आदी विविध आघाडी मिळून ३०० जणांची कार्यकारिणी करण्यात येणार आहे. ही सर्व नियुक्ती ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने केली आहे. रक्षाबंधन उपक्रमांतर्गत ‘एक राखी देवाभावासाठी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून एक लाख राख्या पाठविण्यात येणार आहेत. कुडाळ तालुक्यातून ९ हजार राख्या पाठविचे नियोजन दोन दिवसांत पूर्ण करण्यात येईल. ‘हर घर तिरंगा’ उपक्रम १० ते १५ ऑगस्ट कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com