संवाद योजनेतून आदिवासींना न्याय देण्याचे कार्य
rat९p१९.jpg-
२५N८३२५०
रत्नागिरी : ऑफ्रोटतर्फे शनिवारी आदिवासी गौरव दिन कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील जोपळे. सोबत लुकमान तडवी, सागर पाटील, अॅड. निनाद शिंदे, संतोष कांबळे आदी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----
संवाद योजनेतून आदिवासींना न्याय देण्याचे कार्य
न्यायाधीश पाटील ः ‘ऑफ्रोट’तर्फे आदिवासी गौरव दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही काही लोक उपेक्षित आहेत, शासकीय योजनांपासून दूर आहेत. त्यांना मदत व जनजागृती करण्याचे काम विधी सेवा प्राधिकरण करते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २०१५ मध्ये ट्रायबल संवाद ही योजना आणली असून, त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे. या समाजातील विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून मोठी स्वप्नं पाहावीत व त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, त्यांना नक्कीच स्वकर्तृत्वावर सर्वोच्च पदे भूषवता येऊ लागली आहेत, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी केले.
ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबलच्या जिल्हा शाखेच्यावतीने प्रथमच जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी मारुती मंदिर ते साळवी स्टॉप या मार्गावर रॅली काढण्यात आली. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व ऑफ्रोट संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील जोपळे, स्वागताध्यक्ष तथा ऑफ्रोट संघटनेचे कार्याध्यक्ष लुकमान तडवी, रत्नागिरी जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कांबळे, मेहराज तडवी आदी उपस्थित होते.
प्रा. जोपळे यांनी सांगितले, जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम आयोजित केला असून, आपल्या आदिवासींच्या हक्कांसाठी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कायमच पाठपुरावा करणार आहे; परंतु काहीवेळा आदिवासी समाजातीलच काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात; परंतु आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.
चौकट १
आदिवासी भवन उभारणार
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदिवासी भवनाकरिता जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पुढील ५ वर्षांत आदिवासी भवन उभारून राज्यातील आदिवासींच्या ४५ जाती-जमातींना बोलावू. सर्वांच्या सहकार्याने हे भवन दिमाखदार होईल, असा विश्वास जोपळे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.