माणुसकीला धरून न्याय करण्याचा प्रयत्न केला

माणुसकीला धरून न्याय करण्याचा प्रयत्न केला

Published on

-rat९p२४.jpg-
२५N८३२६७
रत्नागिरी : जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या बदलीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार करताना बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे.
--------
प्रामाणिकपणे न्याय करण्याचा केला प्रयत्न
न्यायाधीश गोसावी ः दिंडोशी येथे बदली निमित्त सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी जिल्हा न्यायालयात १ जानेवारी २०२४ पासून पदभार स्वीकारल्यावर माणुसकीला धरून न्याय केला. सर्वांच्या प्रेमाच्या शिदोरीच्या बळावर कार्यकाळ चांगला गेला. प्रामाणिकपणे न्याय करण्याचा प्रयत्न केला. मतभेद झाले असतील; पण वाद झाले नाहीत. कोकणातील माणसं समुद्राप्रमाणे विशाल मनाची आहेत. लाल माती ओलावा धरून ठेवत नसल्याने चिखल होत नाही, असे भावपूर्ण उद्गार रत्नागिरी जिल्हा प्रधान न्यायाधीश सुनील गोसावी यांनी काढले.
दिंडोशी येथे त्यांची बदली झाल्यामुळे आयोजित शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी गोसावी यांचा सत्कार केला. संवेदनशील मन, धार्मिक वृत्ती, आध्यात्मिक बैठक यातून गोसावी यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल केली. शांत, साधा, सरळ स्वभाव यामुळे वादविवाद न होता कामे मार्गी लागली. गोसावी यांच्या पाठिंब्यामुळे हॉलचा प्रश्न लवकर मार्गी लागला. कुटुंबवत्सल वृत्तीमुळे तणावाविरहित वातावरणातून अनेक विषय तडीस गेले. त्यांना आरोग्यदायी आयुष्यासाठी बारचे अध्यक्ष ॲड. पाटणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिल अंबालकर, ज्येष्ठ ॲड. भाई गवाणकर, सरकारी वकील ॲड. पी. एस. शेट्ये आणि ॲड. सचिन रेमणे यांनीही शुभेच्छा दिल्या. महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com