-गरजू लोकांना प्रत्येक योजनेच्या लाभाला प्राधान्य

-गरजू लोकांना प्रत्येक योजनेच्या लाभाला प्राधान्य

Published on

-rat९p१०.jpg-
२५N८३२२३
दापोली ः आढावा बैठकीदरम्यान बोलताना राज्यमंत्री योगेश कदम.
------
प्रत्येक योजनेचा गरजूंना लाभ देणार
योगेश कदम ः केळशी गटातील गावांमधील समस्यांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ९ ः शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गरीब, गरजू आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे प्राधान्य आहे, अशी ठाम ग्वाही राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी या वेळी दिली.
दापोली तालुक्यातील आडेफाटा येथे शुक्रवारी (ता. ८) केळशी जिल्हा परिषद गटातील ४८ गावांच्या विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीदरम्यान ग्रामस्थ व सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर त्वरित प्रतिसाद देत संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजार ९८२ पात्र लाभार्थ्यांना सामाजिक अनुदान योजनांचा लाभ मिळाला असून, भविष्यात ही संख्या वाढवण्यासाठी वारंवार शिबिरे घेण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या रस्तेकामे व डागडुजीची कामे गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
बैठकीत महसूल, अन्न व नागरी पुरवठा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, वन, आरोग्य अशा २१ जिल्हास्तरीय विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. सामाजिक अनुदान योजना, जिवंत सातबारा मोहीम, अॅग्रीस्टॅक, आयुष्मान भारत, नळपाणी योजना, गावांतर्गत रस्ते, वीज पुरवठा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, रत्नागिरी तहसीलदार अश्विनी पाटील, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com