लतिका लुडबे ‘श्रीफळ’ चषकाच्या मानकरी

लतिका लुडबे ‘श्रीफळ’ चषकाच्या मानकरी

Published on

83289


लतिका लुडबे ‘श्रीफळ’ चषकाच्या मानकरी

मालवणात विजेतेपद; राज्यस्तरीय नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने येथे शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे आयोजित महिलांसाठीच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत लतिका लुडबे यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना सोन्या-चांदीने मढवलेला मानाचा श्रीफळ चषक देऊन गौरविले. हर्षदा पेंडूरकर यांनी उपविजेतेपद पटकावले, तर दीपा पवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाले. स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, कोकण वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग आणि सेवते प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले. आमदार राणे यांचा शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, भाजपचे अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, राजू परुळेकर, बबन शिंदे, विश्वास गावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, लहान मुलांसाठीही नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रशांत पेंडूरकर याने प्रथम, स्वरा कांदळगावकर द्वितीय आणि रोहन गोवेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही सन्मान झाला. यात पारंपरिक वादक लक्ष्मण मालवणकर, बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते पंकज गावडे, ब्लड बँक सिंधुदुर्गचे रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले, मालवणचे नंदकुमार आडकर, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गचे ओमकार लाड, डॉ. प्रसाद धमक, श्री. चिऊळकर, सिद्धेश ठाकूर, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, दर्शन वेंगुर्लेकर आणि व्यावसायिक अनिता आळवे यांचा समावेश होता. स्वराज्य ढोल-ताशा पथकाने ‘महाकाल’ संकल्पनेवर आधारित ढोल वादन सादर केले.
----
विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
विजेत्या लतिका लुडबे यांना सोन्या-चांदीने मढवलेला श्रीफळ चषक, सोन्याची नथ, सोन्याचे नाणे आणि पैठणी. उपविजेत्या हर्षदा पेंडूरकर यांना महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, तारका चव्हाण, नमिता गावकर आणि सौ. प्रभाळे यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी दिली. तृतीय विजेत्या दीपा पवार यांना करुणा जळवी आणि समस्त स्वराज्य, यशराज प्रेरणा, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, तसेच शिल्पा यतीन खोत यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी देऊन सन्मानित केले. उत्तेजनार्थ म्हणून निवड झालेल्या मौसमी जाधव यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com