शिक्षणामुळे भविष्याचा पाया मजबूत

शिक्षणामुळे भविष्याचा पाया मजबूत

Published on

83428

शिक्षणामुळे भविष्याचा पाया मजबूत
नीलेश राणेः तुळसुली कदमवाडी शाळेच्या वर्गखोलीचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः बालकांचा सर्वांगीण विकास हाच खरा भविष्याचा पाया आहे, असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी रांगणा तुळसुली कदमवाडी शाळा वर्गखोली उद्घाटन प्रसंगी केले.
तालुक्यातील रांगणा तुळसुली कदमवाडी येथे जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या शाळा वर्गखोलीचे काम पूर्ण झाले असून, या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिल्हा प्रमुख संजू परब, महिला जिल्हा प्रमुख दीप्ती पडते, तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, माजी सभापती नूतन आईर, माजी सरपंच कान्हू शेळके, पावशी ग्रामपंचायत सरपंच वैशाली पावसकर, ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, सुभाष तुळसुलकर, वामन गोडे, राजू शेळके, जयश्री कोळेकर, सुधाकर सावंत, विनोद गोडे, विलास चव्हाण, रांगणा तुळसुली शाळेचे मुख्याध्यापक राजन कोरगावकर, कदमवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेश गुरव, अंगणवाडी सेविका शिवांगी पावसकर, प्रियांका चव्हाण, कृष्णा पालव आदी उपस्थित होते.
आमदार राणे पुढे म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना नावीन्यपूर्ण शिक्षण फार महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा हा मजबूत पाया प्राथमिक शाळांमधून होत असतो. मराठी शाळांतून विद्यार्थ्यांना संस्कारमय शिक्षण देताना त्यांना नवनवीन शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग आणि शिक्षक प्रयत्नशील आहेत. आजच्या एआय तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना बालकांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करण्याचे काम शिक्षक करत असतात.’’
यावेळी आमदार राणे यांनी गावातील विविध प्रश्नांबाबत ग्रामस्थांची संवाद साधून लवकरच सर्व समस्या सोडवण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com