मृडानी नदीच्या काठावरील धुतपापेश्वर मंदीर
श्रावण सोमवार विशेष--------लोगो
- rat१०p२३.jpg-
P२५N८३४४९
राजापूर ः मृडानी नदीवरून कोसळणारा धबधबा
- rat१०p२१.jpg-
२५N८३४४७
राजापूर ः आकर्षक धुतपापेश्वर मंदिर
- rat१०p२२.jpg-
२५N८३४४८
श्री धुतपापेश्वर
------
‘मृडानी’च्या काठावरील धुतपापेश्वर मंदिर
सुशोभीकरणामुळे नवा साज ; धबधब्याचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः राजापूरचे आराध्यदैवत श्री धुतपापेश्वरचे प्राचीन मंदिर मृडानी नदीच्या काठावर धोपेश्वर येथे बांधले आहे. श्री धुतपापेश्वरचे दर्शन घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हजारो वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या श्री धुतपापेश्वर मंदिरात धार्मिक आणि पर्यटन अशा अनोख्या संगमाची अनुभूती येते.
जागृत देवस्थान म्हणून श्री धुतपापेश्वर मंदिराची रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभर ओळख आहे. निसर्गाच्या सांनिध्यात वसलेले श्री देव धूतपापेश्वर मंदिर राजापूर शहरातून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी फार पूर्वी दगडी बांधकाम केलेली पायवाट थेट महाद्वारापर्यंत होती. आता त्या घाटीचे रस्त्यात रूपांतर झाले आहे. मंदिराबाहेरील महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला श्री वीरभद्राचे मंदिर तर, उजव्या बाजूला उंचस्थानी श्री कालभैरवाचे देवालय आहे. सभामंडपातून मुख्य मंदिराकडे जाताना बाजूलाच मृडानी नदी असून डाव्या बाजूला नवग्रह व मारुती अशा मूर्ती आहेत. या दरवाजाच्या आत गेल्यावर श्रींचे शयनगृह आहे. घुमटाच्या डाव्या बाजूला श्री गजानन व उजव्या बाजूला श्री विष्णूंची मूर्ती आहे. गाभाऱ्यात लागूनच पार्वतीदेवीचे निवासस्थान आहे. मंदिराच्या मागील बाजूला श्री कामेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्या मंदिराच्या डाव्या बाजूला वाहणारी मृडानी नदी आहे. या नदीवरील धबधबा जिथे कोसळतो, त्या स्थानाला कोटीतीर्थ म्हणतात. या धबधब्याखाली शिवलिंग असून नदीपात्रात थोड्या-थोड्या अंतरावर कोटीतीर्थ, अग्नीतीर्थ, ब्रह्मतीर्थ, सरस्वतीतीर्थ, वेदतीर्थ अशी तीर्थे आहेत. मृडानी नदीच्या पलिकडे एक आकर्षक दत्तमंदिर असून नदीच्या पुरात पूर्वी वाहून गेलेल्या या मंदिराची उभारणी दत्तभक्त सदानंद भिकाजी ताटके उर्फ श्री आनंदस्वामी यांनी दत्तभक्तांच्या सहकार्याने केली असल्याचे सांगितले जाते. विजयादशमीला सीमोल्लंघनाचा कार्यकम होत असून हा हरिहर भेट सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.
चौकट
गंगाजल अभिषेकाची पर्वणी
श्रावण सोमवारी श्रीदेव धुतपापेश्वरचे दर्शन घेताना गंगाजलाचा अभिषेक करण्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. उन्हाळे येथील गरम पाण्याचा झऱ्यामध्ये आंघोळ करून ओलित्या अंगाने गंगास्थानी जावून गंगास्नान करायचे. त्यानंतर, तेथून गंगाजल घेवून धोपेश्वर येथे जावून श्री धुतपापेश्वरला गंगाजलाने अभिषेक केला जातो. उन्हाळे येथे पाताळातून प्रकटणाऱ्या गंगामाईचे प्रवाहितपणे सध्या वास्तव्य असल्याची माहिती श्री गंगामाई देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी दिली. गंगामाईच्या या वास्तव्यामुळे भाविकांना श्रावण महिन्यामध्ये विशेषतः श्रावण सोमवारी गंगाजलाने श्रीदेव धुतपापेश्वरला अभिषेक करण्याची अनोखी पर्वणी साधण्याची संधी प्राप्त झाली आहे.