-मुचकुंदीच्या काठावरील डोर्लेतील स्थानेश्वर मंदिर
श्रावण सोमवार विशेष--लोगो
ग्राफीक पद्धतीने घ्यावे
-rat१०p२७.jpg-
२५N८३४५३
रत्नागिरी ः तालुक्यातील डोर्ले येथील शंकराचे मंदिर.
- rat१०p२८.jpg-
P२५N८३४५४
रत्नागिरी ः मंदिरातील सभामंडप
- rat१०p२९.jpg-
P२५N८३४५५
रत्नागिरी ः शंकराची पिंड
- rat१०p३०.jpg-
२५N८३४५६
मंदिराजवळील पाण्याची झरी.
- rat१०p३१.jpg-
P२५N८३४५७
मंदिराजवळ असलेली मुचकुंदी नदीतून गावखडीतून डोर्ले येथील मंदिरात येता येते.
- rat१०p३३.jpg-
P२५N८३४५९
उत्सवकाळात बांधण्यात येणारी वैशिष्ट्यपूर्ण तांदूळाची पूजा.
----
वेगळेपण जपलेले डोर्लेतील स्थानेश्वर मंदिर
वसले मुचकुंदीच्या काठी ; बारमाही वाहणाऱ्या झरीच्या पाण्याने अभिषेक
सुधीर विश्वासराव ः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः परशुराम भूमीत वसलेले मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या डोर्ले गावातील स्थानेश्वर मंदिराने आपले वेगळेपण जपले आहे. श्रावण सोमवार, कार्तिक उत्सव, महाशिवरात्र आदी उत्सव साजरे करून येथील ग्रामस्थांनी परंपरा जोपासली आहे डोर्ले (डोरलं हा ग्रामीण शब्द) म्हणजे मंगळसूत्र. नदीच्या विशिष्ट आकारामुळे एका ठिकाणी मंगळसुत्राचा भास होतो त्यामुळे या गावाला डोर्ले हे नाव पडले असावे.
या गावात ग्रामदैवत स्वयंभू स्थानेश्वराच्या देवळाच्यापुढे माड पोफळीच्या सावलीत पायवाटेने गेले की समोर पायऱ्या उतरून लागते स्थानेश्वराची झरी. याच पाण्याने शिवशंकर स्थानेश्वराला अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीला, कार्तिक उत्सवाला याच शीतल पाण्याची संततधार स्थानेश्वराच्या पिंडीवर धरली जाते.
लांजा तालुक्यात येणारी हर्चे, बेनी आणि भडे ही तिन्ही गावे या गावाच्या शेजारी. बेनी हे गाव सरदार खानविलकर यांचे. तेथील देवी ही डोर्ले येथील स्थानेश्वर, हर्चे येथील सत्येश्वर आणि भडे येथील सोमेश्वर यांची बहीण असल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे परंपरेने ही गावे एकमेकांशी जोडली आहेत. स्थानेश्वर आपले स्थान सोडून आपल्या देवळाच्या बाहेर येत नाही म्हणूनच याला स्थानेश्वर नाव पडले. या ठिकाणी श्री. ब्रम्हेंद्र स्वामी यांचे येणे जाणे होते. याठिकाणी महाशिवरात्रीला तसेच कार्तिक पौर्णिमेला विशेष मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावणात शिवशंकराच्या पिंडीवर येथील झरीवरील पाण्याची संततधार असते.
चौकट
ब्रम्हेंद्र स्वामींनी केली गाभाऱ्याची निर्मिती
डोर्ले गाव हे पेशवे काळात महत्त्वाचे केंद्र होते. श्री. ब्रम्हेंद्र स्वामी (धावडशी संस्थान) यांच्या ठिकाणी सुद्धा डोर्ले आणि श्री स्वयंभू स्थानेश्वर मंदिराचा उल्लेख सापडतो. साधारणपणे या गावाला ५०० वर्षांचा इतिहास आहे. मुख्य गाभाऱ्याची निर्मिती श्री. ब्रम्हेंद्र स्वामी यांनी केली आहे.
चौकट
पालखी प्रदक्षिणेचा सोहळा अभूतपूर्व
येथील उत्सवात वैशिष्ट्यपूर्ण ठेक्यात येथील मानकरी मंडळी स्थानेश्वराला पालखीमध्ये विराजमान करून देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. हा सोहळा खूपच अभूतपूर्व असा असतो. लयबद्ध पद्धतीने आणि सारस्वत ठेक्यात विशेष पदे जी अनेक पिढ्या चालत आलेली आहेत ती म्हणत पालखी नाचवली जाते.
चौकट
पिंडीवर ११ किलो तांदुळाची वैशिष्ट्यपूर्ण पूजा
उत्सव काळात येथील पिंडीवर नारळाच्या पात्या, केळी असे नैसर्गिक साहित्य वापरून पूजा बांधली जाते. यामध्ये साधारण ११ किलो तांदूळ पिंडीवर रचले जातात. अशी पूजा बांधण्याची कला येथील डोर्ले येथील लिंगायत घराण्याला अवगत आहे हे विशेष. पंचक्रोशीत डोर्ले, हर्चे, भडे, मावळंगे येथील शिवशंकराच्या पिंडीवर डोर्ले येथील लिंगायत घराणे ही पूजा बांधतात. अशी आगळीवेगळी पूजा फक्त याच ठिकाणी बघण्यास मिळते.