जिव्हाळा सेवाश्रमातील लाभार्थ्यांना रक्षाबंधन
83471
जिव्हाळा सेवाश्रमातील
लाभार्थ्यांना रक्षाबंधन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः रक्षाबंधन सणानिमित्त जिव्हाळा सेवाश्रमास आगळा उपक्रम राबविण्यात आला. येथील पी. एन. गाडगीळ सुवर्णकार यांच्या वतीने त्यांच्या समुहातील प्रतिनिधींनी आश्रमातील लाभार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी पी. एन. गाडगीळ यांच्यातर्फे जागृती मुननकर, साक्षी चोडणकर, राहुल दबडे आदींसह जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे, जयप्रकाश प्रभू आणि इतर सहकारी, हितचिंतक उपस्थित होते. हा समाजोपयोगी कार्यक्रम राबविल्याबद्दल बिर्जे यांनी कौतुक केले. समाजाने दुर्लक्षित केलेल्या अनाथ बांधवांना राखी बांधून प्रेरणादायी संदेश समाजाला दिल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.......................
83472
वरेरी अंगणवाडीतील
विद्यार्थ्यांना रेनकोट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ११ः तालुक्यातील वरेरी गावठण अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शिरवल (ता. कणकवली) येथील प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सरपंच प्रिया गोलतकर यांनी व्यक्त केले.
वरेरी गावठण अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरेरी सरपंच प्रिया गोलतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी किशोर धांडे, प्रफुल्ल गोलतकर, अंगणवाडी सेविका शुभांगी धुरी, मदतनीस अक्षता सावंत, विनायक धुरी, विभावरी घाडी, रिद्धिमा थोटम, नेहा सावंत, सई सावंत आदी उपस्थित होते. प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत यंदा राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.