मंडणगड न्यायालय इमारतीचे काम प्रगतीपथावर

मंडणगड न्यायालय इमारतीचे काम प्रगतीपथावर

Published on

-rat१०p१९.jpg-
२५N८३४३५
मंडणगड ः मंडणगड न्यायालय इमारतीचे प्रगतीपथावर असलेले काम.
----
मंडणगड न्यायालय इमारतीचे काम गतीने
लोकार्पण शनिवारी शक्य ; वरिष्ठ यंत्रणा डेरेदाखल
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १० ः मंडणगड तालुक्याचे दिवाणी कनिष्ठ न्यायालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. १६ ऑगस्टला न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.
न्यायपालिका, बांधकाम विभाग, विधी व न्याय विभाग, गृह विभाग, पोलीस दल यांच्यासह यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांच्या मंडणगड वाऱ्या वाढलेल्या आहेत. इमारतीच्या लोकापर्ण कार्यक्रमाबरोबरच न्यायालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाच्या इमारतीच्या दोन मजल्याचे काम १०० टक्के पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित दोन मजल्यांचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत मुदत असल्याची माहिती बांधकाम अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. शेवटच्या टप्प्यात ६०० हून अधिक कामगार इमारतीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. याशिवाय इमारतीचा जोड रस्ता, पुतळ्याचे फाउंडेशन संरक्षक भिंत यांचे कामही लवकरच पूर्णत्वास जाईल.

चौकट
इमारतीचा नवीन आराखडा
तळमजला व तीन मजले, दोन कोर्ट सभागृह, प्रशासकीय खोली, लॉकअप सुविधा, ए. टी. एम, परिषद सभागृह, न्यायाधीश कार्यालय, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, तीन लिप्ट, स्वतंत्र जिने, बार असोसिएशन महिला व पुरुषांकरिता विशेष व्यवस्था या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे नवीन डिझाईन असलेली पहिली इमारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com