प्लास्टिकचे ध्वज विकरणाऱ्यांवर कारवाई करा

प्लास्टिकचे ध्वज विकरणाऱ्यांवर कारवाई करा

Published on

‘प्लास्टिकचे ध्वज विकणाऱ्यांवर कारवाई करा’
चिपळूण ः राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाने प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. येथील पोलिस ठाण्यात याबाबत निवेदन देण्यात आले. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्‍यांवर कारवाई करावी, असे निवदेनात म्हटले आहे. हे निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने गोरक्ष जोशी, शिवसेनेचे गुहागर तालुका विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, प्रशांत उतेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी, देवव्रत तांबे, राजेश टोणे, विश्व हिंदू परिषदचे पराग ओक, समितीचे सचिन सकपाळ, विनायक जगताप, प्रभाकर खराडे आणि सनातन संस्थेचे ज्ञानदेव पाटील हे उपस्थित होते.

भोम येथील शिर्के विद्यालयात
अमली पदार्थविरोधी दिन साजरा
चिपळूण ः तालुक्यातील भोम येथील महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमली पदार्थविरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्था सचिव प्रशांत शिर्के, मुख्याध्यापक तानाजी कांबळे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते. या वेळी विद्याधन होमकर, संभाजी कुरून यांनी मनोगते व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी यावर आपापली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शिक्षक होमकर यांनी केले. या वेळी संस्था सचिव प्रशांत शिर्के, मुख्याध्यापक तानाजी कांबळे, शिक्षिका रोशनी साखरपेकर, शिक्षक गणेश सोनावणे, उत्तम पोटभरे, संभाजी कुरून, स्वप्नील आंबेडे, सचिन केंबळे आदी उपस्थित होते.

क्रीडाशिक्षक प्रमोद कदम यांचा
राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेकडून सत्कार
रत्नागिरी : जीजीपीएसमधील क्रीडाशिक्षक प्रमोद कदम यांचा श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रसिद्ध उद्योजक उदय लोध आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्राप्त झाला. कदम हे १५ वर्षे क्रीडाशिक्षक म्हणून जीजीपीएसमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तम खेळाडू घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. कबड्डीपटू, नामवंत पंच व क्रीडाशिक्षक म्हणून कदम यांचा नावलौकिक आहे. या सत्काराबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com