लायन्स क्लबतर्फे ऑगस्ट क्रांती दिन रॅलीला प्रतिसाद

लायन्स क्लबतर्फे ऑगस्ट क्रांती दिन रॅलीला प्रतिसाद

Published on

-rat११p४.jpg-
P२५N८३६२९
रत्नागिरी : लायन्स क्लब आयोजित ऑगस्ट क्रांतिदिन रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी विद्यार्थी.
-----
‘लायन्स’तर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी रॅली
जयस्तंभ येथे मानवंदना ; ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. जयस्तंभ येथून रॅलीची सुरुवात होऊन स्वा. सावरकर चौक येथे सांगता करण्यात आली. या वेळी देशभक्तिपर घोषणा, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद अशा विविध घोषवाक्यांचा जयघोष घुमला. हातात तिरंगा, अंगावर शाळेचा गणवेश आणि देशभक्तीने उजळलेले चेहरे पाहून उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे संचार झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण पोलिस उपनिरीक्षक शिंदे व लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रॅलीच्या मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
रॅलीत शिर्के हायस्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, नाईक हायस्कूल, देसाई हायस्कूल, गोदूताई जांभेकर हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल व फाटक हायस्कूलच्या ४०० विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. उत्कृष्ट घोषवाक्य, उत्कृष्ट संचलन व उत्कृष्ट वेशभूषा या तीन गटांमध्ये विजेत्या शाळांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. संतोष बेडेकर, अॅड. शबाना वस्ता, डॉ. शिवानी पानवलकर, डॉ. सचिन पानवलकर आणि डॉ. गणेश कुलकर्णी यांनी केले. अध्यक्ष संजय पटवर्धन, सचिव शरद नागवेकर, खजिनदार मनोज सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रॅली यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह ओंकार फडके, गणेश धुरी, प्रमोद खेडेकर, पराग पानवलकर, शिल्पा पानवलकर, सुप्रिया बेडेकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com