रत्नागिरीत आज रंगणार अष्टावधान कला कार्यक्रम

रत्नागिरीत आज रंगणार अष्टावधान कला कार्यक्रम

Published on

‘अष्टावधान कला’ आज रंगणार
रत्नागिरीत आयोजन ; मौखिक परंपरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत सप्ताहाची सांगता अष्टावधान कला या अनोख्या कार्यक्रमाने मंगळवारी (ता. १२) होणार आहे. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत झाडगाव येथील माधवराव मुळे भवनात हा कार्यक्रम होणार आहे.
संस्कृत भारतीने गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व विविध विद्यालये यांच्या सहकार्याने संस्कृत सप्ताहात विविध कार्यक्रम साजरे केले.
भारतीय शिक्षण परंपरेमध्ये अष्टावधान कला ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. जुन्या काळातल्या मौखिक परंपरांपैकी ही एक मौखिक परंपरा आहे. या कलेमध्ये जी मुख्य व्यक्ती आहे तिला अवधानी असे म्हटले जाते. ही व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते. यात बंगलोर येथील डॉ. उमामहेश्वर ना हे अवधानी आहेत. शृंगेरी येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले असून, त्यांनी ३० ठिकाणी अष्टावधान सादर केले आहे. प्रच्छक म्हणून श्री. महाबलभट्ट, डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, योगिता केळकर, मयुरी जोशी, चैतन्य पाडळकर, राजेश कुमार आणि मैत्रेयी आमशेकर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृत भारतीच्या कोकण प्रांताध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.

चौकट १
विचारले जाणारे प्रश्न
अष्टावधानकलेच्या कार्यक्रमात निषिद्धाक्षरी (कोणत्याही विषयावर काव्य करताना विशिष्ट अक्षर वापरू नये), समस्यापूर्ती (एका चरणानुसार दुसरा चरण रचणे), दत्तपदी (दिलेल्या विशिष्ट शब्दांचे संस्कृत काव्य रचणे), आशुकाव्य (शीघ्र काव्य), चित्रकाव्य (वैचित्र्यपूर्ण बंधामध्ये काव्यरचना केली जाते आणि फलकावर त्या बंधाच्या आकृतीसह ते लिहून प्रेक्षकांना दाखवले जाते) दिले जाणार आहे. काव्यवाचन (श्लोक गायन केल्यावर तो श्लोक कोणत्या ग्रंथ, वृत्तातील शोधणे), संख्याबंध (संख्यात्मक कठीण गणित) आणि अप्रस्तूतप्रसंग (विचलित करण्याच्या दृष्टीने गोंधळात टाकणारे प्रश्न) असे आठ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com