वेताळबांबर्डे वसतिगृहात आदिवासी दिन उत्साहात

वेताळबांबर्डे वसतिगृहात आदिवासी दिन उत्साहात

Published on

swt126.jpg
83923
वेताळबांबर्डेः वसतिगृहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

वेताळबांबर्डे वसतिगृहात
आदिवासी दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक आदिवासी दिन नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी, सहाय्यक लोक अभिरक्षक ॲड. एस. एस. खुणे, नाग्या महादू वसतिगृह अध्यक्ष उदय आहिर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. खुणे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. सचिव न्या. गुंडेवाडी यांनी तेथील विद्यार्थ्यांना आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे, असे सांगितले. भारतीय संविधानाने दिलेल्या आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांबद्दल माहिती दिली. यामध्ये जमीन, जंगल, संस्कृती आणि राजकिय प्रतिनिधित्वाचा अधिकारांचा समावेश होता. आहिर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास ४० विद्यार्थी उपस्थित होते.
...................
swt127.jpg
N83924
कुडाळ ः जिल्हा ग्रंथालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.

कुडाळ ग्रंथालयामध्ये
ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त येथील राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय) कुडाळच्या वतीने ग्रंथालयात नवीन पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरविंद शिरसाट आणि डॉ. विवेक पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनास वाचकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रंथपाल राजन पांचाळ, अनुष्का शिवडावकर, कर्मचारी आणि वाचक उपस्थित होते. या प्रदर्शनाचा आणि ग्रंथांचा वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिरसाट यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com