तिरंग्याखाली नागरिकांची अभिमानाची एकजूट
83953
तिरंग्याखाली नागरिकांची अभिमानाची एकजूट
सावंतवाडीत भाजपतर्फे तिरंगा यात्रा; ‘वंदे मातरम्’चा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत येथे आज आयोजित भव्य तिरंगा यात्रेला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. विविध राजकीय, सामाजिक संघटना, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या या यात्रेने देशाबद्दलची एकता आणि अभिमान व्यक्त केला.
भाजपचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून या यात्रेचे आयोजन करण्यात आले. येथील ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणातून या तिरंगा यात्रेचा प्रारंभ झाला. शहरातून फिरून ही यात्रा जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे समाप्त झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनीही तिरंगा यात्रेच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांना संबोधित करीत तिरंग्याचे महत्त्व आणि या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गावडे, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर,
जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, सिद्धेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत जाधव, दिलीप भालेकर, प्रा. विकास गोवेकर, अमेय तेंडोलकर, नाथा कदम, हेमंत खानोलकर, मेघना साळगावकर यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, महिला, डॉक्टर, पत्रकार, व्यापारी, तसेच तालुक्यातील असंख्य देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यावेळी सावंतवाडीकरांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती दिसून आली.
.....................
‘तिरंगा’ बलिदान, त्यागाचे प्रतीक
यावेळी संदीप गावडे म्हणाले, ‘आपला ‘तिरंगा’ भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो. आपण जरी विविध जाती, धर्म आणि पक्षांमध्ये विभागले गेलो असलो तरी, हा राष्ट्रध्वज सर्वांना एकत्र आणतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी व तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. आपल्या राष्ट्रध्वजातून देशाचे सामर्थ्य, सार्वभौमत्व आणि जागतिक स्तरावरील मान-सन्मान दिसून येतो. राष्ट्रध्वजाचा व देशाचा हाच गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन केले.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.