टिके, चांदेराई रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरा

टिके, चांदेराई रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरा

Published on

- rat१२p१०.jpg-
२५N८३८७६
रत्नागिरी : कार्यकारी अभियंता ओटवणेकर यांना खड्ड्यांबाबतचे निवेदन देताना भाजप मंडल अध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे.

टिके, चांदेराई रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरा
दादा दळी ः बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजपतर्फे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : हरचेरी-देवधे राज्यमहामार्गावरी खड्डे बुजवा, अशी मागणी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी मंडल अध्यक्ष दादा दळी व उत्तरचे अध्यक्ष विवेक सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
तालुक्यातील हरचेरी-देवधे राज्य महामार्ग क्र. १६५ वर टिके शिंदेवाडी व चांदेराई धरणासमोर रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणेही त्रासदायक ठरत आहे. या ठिकाणी अनेक दुचाकीचालकांचे अपघात झाले आहेत. हरचेरी-देवधे या रस्त्याची दूरवस्था झाली असून, तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांनाही प्रचंड त्रास होत आहे. याबाबत दादा दळी व विवेक सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकामखात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी कार्यकारी अभियंता ओटवणेकर यांना निवेदन देत खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. ओटवणेकर यांनी उपविभाग क्र. ४चे शाखा अभियंता कांबळे यांना बोलावून खड्डे तत्काळ भरण्याचे आदेश दिले.

चौकट
वाहतूक वाढल्याचा परिणाम
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणामुळे अनेकजण रत्नागिरीत येण्यासाठी राजापूर, लांजा तालुक्यातील प्रवासी हरचेरी-देवधे मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. अनेक अवजड वाहनेही येथून ये-जा करत असतात. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com