-कुंचल्यातून अवतरला निसर्गाचा अद्भुत आविष्कार
-rat१३p८.jpg, rat१३p९.jpg-
२५N८४१२९, २५N८४१३०
चिपळूण ः चित्रकार विष्णू परीट यांनी साकारलेल्या अद्भुत कलाकृती.
---
कुंचल्यातून अवतरला निसर्गाचा अद्भुत आविष्कार
चित्रकार विष्णू परीट यांच्या कलाकृती; गांग्रईतील कार्यशाळेत अनोखी चित्रं
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः कलाकाराचा कुंचल्यात जादू असते. या जादूमागे कलाकाराचे अथक परिश्रम दडलेले असतात. जेवढा सुंदर निसर्ग असतो तेवढीच सुंदर कलाकृती साकारण्याचा प्रयत्न कलाकार करत असतो. संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे गावचे प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी त्यांच्या जादूई कुंचल्यातून चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथील सुंदर निसर्ग आपल्या कलाकृतीत साकारला आहे.
चिपळूण तालुक्यातील गांग्रई निसर्ग पर्यटन येथे माजी आमदार सदानंद चव्हाण आणि ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांच्या संकल्पनेतून राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून नामवंत चित्रकार चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथे कला कार्यशाळेसाठी दाखल झाले होते. नामवंत कलाकारांसाठी अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करायची ही दुसरी वेळ होती. गतवेळेच्या कार्यशाळेत असणारे कलाकार आणि या वेळी उपस्थित असणारे कलाकार वेगवेगळे होते. या कार्यशाळेला ४५पेक्षा अधिक नामवंत कलाकार उपस्थित राहणे, ही कोकणसाठी अभिमानाची बाब ठरली.
या कार्यशाळेत सहभागी असणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट हे गेली तीस वर्षे जलरंगात काम करत असून, सातत्यपूर्ण सरावामुळे त्यांनी जलरंगावर जबरदस्त प्रभूत्व मिळवलं आहे. त्यांची जलरंगशैली प्रवाही, मोजक्या रंगांची, टवटवीत आणि प्रभावी अशी आहे. त्यांची निसर्गचित्रं हुबेहूब असल्यामुळे रसिक त्यांच्या कलाकृती पाहून मनोमन सुखावून जातो. परीट यांच्या जलरंग निसर्गचित्रांची आजवर अनेक प्रदर्शने झाली असून, त्यांच्या चित्रांना राज्यस्तरावरील विविध पारितोषिकं प्राप्त झाली आहेत. गांग्रई येथे परीट यांनी तीन दिवसात एकूण चार कलाकृती साकारल्या. या सर्व कलाकृतींच उपस्थित कलाकारांनी कौतुक केलं.
कोट
चिपळूण तालुक्यातील गांग्रईसारख्या निसर्गरम्य ठिकाणी निसर्गाच्या विविध रूपांचे रेखाटन करायला मिळणे, ही कलाकारांसाठी खूप मोठी संधी होती. यामुळे विविध कलाकारांच्या शैलींचा अभ्यास करता आला. या कार्यशाळेतून खूप काही शिकायलाही मिळाले. माजी आमदार सदानंद चव्हाण आणि ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी कलाकारांना अशी संधी प्राप्त करून दिली, ही कलेप्रति त्यांच्या मनात असणारी कृतज्ञताच आहे.
- विष्णू परीट, निसर्ग चित्रकार सोनवडे, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.