उपअधीक्षक बळेंनी पद्‍भार स्विकारला

उपअधीक्षक बळेंनी पद्‍भार स्विकारला

Published on

उपअधीक्षक बेळेंनी पदभार स्वीकारला
चिपळूण : चिपळूण पोलिस उपविभागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या फेरबदलाअंतर्गत प्रकाश बेळे यांची उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, मुंबई पोलिस शांताराम शिंदे, राजेश सुतार, नरेंद्र चव्हाण, अनंत चव्हाण, अजय यादव, संदेश गोरिवले, नयन चव्हाण, आशुतोष गोरिवले आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर बेळे यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणि नागरिकांशी सुसंवाद वाढवणे, हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले.


अॅड. शिवलवकर यांची निवड
राजापूर ः महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा विभागाच्या न्यायालयीन कामकाजासाठी वरिष्ठ वकील म्हणून शहरातील अ‍ॅड. गुरुप्रसाद शिवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोटरी असोसिएशन मावळ तालुका कार्यकारिणीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अ‍ॅड. शिवलकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अ‍ॅड. शिवलकर हे रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयातही नियमित प्रॅक्टिस करतात. राजापूर येथील हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी असून, त्यांचा राजापूरमधील सामाजिक उपक्रमांत नेहमीच सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

युनायटेडचा व्हॉलीबॉल संघ उपविजेता
चिपळूण : चिपळूण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलचा १७ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात दमदार खेळ करून या संघाने तालुकास्तरावर दुसरा क्रमांक मिळवला. विजयी संघात वेदांत सुळे, नैतिक नलावडे, आर्यन शिर्के, शतांशू शिंदे, स्वराज चुनकीकर, समर सुर्वे, आर्यन शिर्के, सोहम टाकळे, समर्थ वाईल आणि शिवराम वाघे यांचा समावेश होता. संघाला क्रीडाशिक्षक समीर कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

-rat१३p१५.jpg-
P२५N८४१५३
दापोली ः सर्व पत्रकारांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून सन्मानित करताना नगराध्यक्षा कृपा घाग व त्यांच्या सर्व सहकारी.

दापोली नगरपंचायतीतर्फे
पत्रकारांना रक्षाबंधन सन्मान
दापोली ः दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, सर्व नगरसेविका आणि महिला कर्मचाऱ्यांच्यावतीने दापोलीतील पत्रकारांसाठी नगरपंचायत कार्यालयात रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. घाग यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्व पत्रकारांना नगरसेविका व महिला कर्मचाऱ्यांनी राखी बांधून सन्मानित केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाने बहाल केलेल्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल नगरपंचायतीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेविका रिया सावंत, प्रीती शिर्के, अश्विनी लांजेकर, नगरपंचायत कर्मचारी अनामिका सांबरे, शीतल शेठ, योगिता गायकवाड, निकिता कालेकर, हर्षदा माने, शिवसेना युवाशक्तीच्या केतकी परांजपे, माजी नगरसेविका रसिका पेठकर आदी मान्यवर महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com