चिपळूण ः ११ गावातील २८ .२५ कोटींचा मोबदला प्रस्तावित

चिपळूण ः ११ गावातील २८ .२५ कोटींचा मोबदला प्रस्तावित

Published on

जमिनीचा २८.२५ कोटींचा मोबदला प्रस्तावित
चिपळूण - गुहागर मार्ग ः खात्यावर लवकरच रक्कम वर्ग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण-गुहागर मार्गावरील रूंदीकरणप्रकरणी संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याचा प्रस्ताव येथील प्रांत कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला आहे. ११ गावांतील सुमारे २८ कोटी २५ लाखाचा मोबदला प्रस्तावित आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात गुहागर-विजापूर महामार्गावरील भूसंपादन मोबदला वितरणाबाबत बैठक घेण्यात आली होती. यापूर्वी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मोबदला वाटपाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवला होता; मात्र नव्या शासननिर्णयानुसार चारपटऐवजी दुप्पट मोबदला देण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली होती तसेच ७ वर्षाऐवजी ५ वर्षातील व्याजाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना देण्याचे कळवले होते. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दुप्पट मोबदला आणि ५ वर्षाचे व्याज देण्याचे सूत्र ठरले होते. त्यानुसार प्रांत कार्यालयाकडून नव्याने मोबदला वाटपाचा प्रस्ताव तयार करून तो दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला. त्यास आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मोबदला वाटपाचा तिढा सुटण्यासाठी काही पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी सातत्याने प्रयत्न करत होते. येत्या काही दिवसात यावर तोडगा निघणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com