प्रेमजीभाई विद्यालयात विविध उपक्रम
प्रेमजीभाई विद्यालयात
विविध उपक्रम
चिपळूण ः येथील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात क्रांतिदिनानिमित्त शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका नाईक यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक आणि लोकनेते यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शिक्षिका सिद्धी ठसाळे, आदिती रायकर, गणेश घस्ते व अन्य शिक्षक उपस्थित होते. शिक्षक आशिष मांडवकर यांनी क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. अद्वैत पांचाळ याने क्रांतिदिनाचे महत्त्व सांगणाऱ्या कवितेचे वाचन केले तसेच चौथीतील प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी व शाळेतील शिक्षकांनी देशभक्तिपर गीते सादर केली. मुख्याध्यापिका नाईक यांनी क्रांतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दैनंदिन जीवनामध्ये आपण कशाप्रकारे देशसेवा करू शकतो, हे विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून दिले.
रामपूर ग्रामपंचायतीत
कृषिदुतांमार्फत मार्गदर्शन
सावर्डे : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आणि टिकाऊ शेतीपद्धतींचा प्रसार करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे रामपूर ग्रामपंचायतीत आयोजित गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील कृषिदुतांनी सांगितले. या वेळी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते, प्रा. अनिल कांबळे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले, रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच अमिता चव्हाण, ग्रामसेवक महादेव शेंडगे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. गोकुळ मिसाळ, निर्मल ग्रामपंचायत कात्रोळीचे सरपंच श्रीकांत निवळक, ग्रामसेवक वर्षा शिंदे आदी उपस्थित होते. माहितीकेंद्रात विविध स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी साधने, नवीन बियाण्यांच्या जाती, प्रगत पाणी व्यवस्थापन तंत्र, सेंद्रिय शेतीपद्धती, कीड व रोग नियंत्रणाचे प्रभावी उपाय आणि उत्पन्न वाढवण्यासाठीच्या नावीन्यपूर्ण पद्धती यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.