कुडाळ येथील शिबिरामध्ये ''सीपीआर''बाबत मार्गदर्शन

कुडाळ येथील शिबिरामध्ये ''सीपीआर''बाबत मार्गदर्शन

Published on

swt1421.jpg
84458
कुडाळः सीपीआर कॅम्पमध्ये सहभागींना प्रमाणपत्र देताना डॉ. जी. टी. राणे. सोबत साईराज जाधव, श्री. महाजन, पंकज गावडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळ येथील शिबिरामध्ये
‘सीपीआर’बाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत सर्व जिमच्या संचालक आणि ट्रेनरनी एकत्रित सीपीआर कॅम्प लवकरच घेण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळचे डॉ. जी. टी. राणे यांनी केले
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लोककल्प फाउंडेशन आणि राणे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ यांच्यावतीने आयोजित सीपीआर कॅम्प राणे हॉस्पिटल येथे यशस्वीपणे पार पडला. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. जी. टी. राणे, डॉ. आजगावकर (गोवा), क्रांतिकुमार नागवेकर, ‘गिअर अप’ जिम पिंगुळी-कुडाळचे संचालक साईराज जाधव, पंकज गावडे, ऋषिकेश महाजन, लोकमान्य सोसायटी कुडाळ शाखेचे व्यवस्थापक ऋषिकेश सामंत, रिजनल मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर उपस्थित होत्या.
उपस्थितांना ‘सीपीआर’ विषयक मार्गदर्शन डॉ. राणे, डॉ. आजगावकर, नागवेकर यांनी केले. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. लोकमान्यच्या असिस्टंट मॅनेजर युगा मळगावकर, अंकिता पेडणेकर, अंकिता खानोलकर, ‘लोककल्प’च्या गौरी जुवेकर, भानुदास वालावलकर, दिव्येश बिरोडकर, जानू पाटील, दिनेश नानचे उपस्थित होते. सूत्रसंचालन मयुर पिंगुळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com