सावर्डेत साकारताहेत शाडू मातीच्या मूर्ती
येई गणेशा--------लोगो
rat१४p३.jpg-
P२५N८४४०६
सावर्डे ः गणेशमूर्ती कामात दंग असलेले सावरटकर कुटुंबीय. (अशोक कदम : सकाळ छायाचित्र सेवा)
सावर्डेतील सावरटकरांनी जपला शाडूच्या मूर्तीचा वारसा
पर्यावरण संवर्धनावर भर ; ५० वर्षाची परंपरा, गणेशक्तांचीही पसंती
अशोक कदम ः सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ ः गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी कोकणवासीय सज्ज होत आहेत. गावोगावी गणेशशाळांमधून मूर्तिकारांची कसरत सुरू आहे. गेली पन्नास वर्षे गणेशमूर्ती घडवणाऱ्या सावर्डे (ता. चिपळूण) येथील संतोष सावरटकर यांच्या कार्यशाळेतही गडबड सुरू आहे. केवळ शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या कलेत सावरटकर यांचे नाव आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, कृत्रिम रंग आणि रासायनिक सजावटीच्या वस्तूंचा वापर टाळून केवळ धार्मिक श्रद्धा म्हणून पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यावर त्यांचा भर आहे.
ग्राहकांनी आणलेल्या चित्रातील गणपती ते शाडू मातीने बनवतात. गणपतीचे चित्र घेऊन या आणि चित्राप्रमाणे मातीची मूर्ती घेऊन जा, असा त्यांचा आग्रह आहे. गणेशमूर्तीचा चेहरा हे त्यांच्या मूर्ती कारखान्याचे वेगळेपण आहे. पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या भाविकांमध्ये शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मुंबई, पुणे, चिपळूणसारख्या शहरांतूनसुद्धा येथील कार्यशाळेतून गणपती मूर्ती बनवून नेण्यात येतात. ग्राहकांना मूर्ती घेताना समाधान मिळावे आणि विसर्जनानंतर निसर्गाचीही हानी होऊ नये असा हेतू ठेवूनच ते काम करत आहेत. संतोष सावरटकर यांचा मुलगा डिप्लोमा इंजिनिअर आहे. नोकरी सांभाळून दोन महिने तो वडिलांना मदत करतो तसेच संतोष यांची पत्नी या घरकाम सांभाळून मदत करत असतात. माती भिजवण्यापासून मूर्तीचा साचा चिखलाने थापून देण्यापर्यंतची कामे त्या करतात. प्रसंगी रंगकामात त्यांचे सहकार्य असते. ते मातीच्या १२० गणेशमूर्ती तयार करतात. सध्या एक फुटापासून पाच फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे.
चौकट
वडिलांची इच्छा
गणेशमूर्ती ही शाडूच्या मातीपासूनच बनवायची, असा सावरटकर यांच्या वडिलांचा आग्रह होता. त्यामुळे वडिलांच्या इच्छेनुसार शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवत आहेत. ते शाडूची माती पेण येथून आणतात. या मातीची स्वच्छता, गाळणी आणि पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करून मूर्ती बनवण्यायोग्य माती तयार करतात. शाडू मातीची किंमत, वाढत्या महागाईमुळे तसेच हाताने काम करण्यासाठी लागणारा वेळ ही कारागिरांसमोरील सध्याची आव्हाने आहेत. तरीही नफ्यापेक्षा निसर्गाच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्यात आनंद अद्वितीय असतो, असे सावरटकर यांनी सांगितले.
----
कोट
शाडू माती ही नैसर्गिकरीत्या गाळयुक्त, लवचिक आणि पाण्यात सहज विरघळणारी आहे. त्यामुळे पर्यावरणास अपाय होत नाही. जलप्रदूषण न होता विसर्जनानंतर काही तासांत मूर्ती पूर्णतः विरघळते. ही फक्त व्यवसायाची गोष्ट नाही तर आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. शाडू माती महागडी तसेच वाहतूक खर्चामुळे उत्पादन खर्चही वाढतो. पावसाळ्यात माती लवकर वाळत नाही त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते.
- संतोष सावरटकर, सावर्डे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.