''त्या'' ठरावाला ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध
- rat१४p४.jpg-
२५N८४४०७
दापोली ः पत्रकार परिषदेला उपस्थित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे आदी.
दापोली नगरपंचायत------लोगो
‘त्या’ ठरावास ठाकरे पक्षाचा विरोध
ऋषिकेश गुजर ः अपहारातील कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ : दापोली नगरपंचायत भ्रष्टाचारमुक्त करण्याचा नारा देत आम्ही सत्तेच सामील झालो होतो. त्याप्रमाणे दापोली नगरपंचायतीत अपहार करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला; मात्र हा सर्व प्रकार ज्यांनी उघड केला त्यांनाच आता संबंधित कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता द्या, असे सांगावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर टीकास्त्र सोडले तसेच सर्वसाधारण सभेत या विषयासंदर्भात झालेल्या चर्चेवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दापोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा १३ ऑगस्टला झाली. त्या सभेत दापोली नगरपंचायतीमधील निलंबित कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्या विषयावर महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी दापोलीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक एम. आर. शेटये, शहराध्यक्ष ॲड. खलील डिमटीमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कदम, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, महिला संघटक साक्षी कळसकर, ठाकरे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, शहराध्यक्ष संदीप चव्हाण, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, युवासेनेचे साईराज मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी महाविकास आघाडीची दापोली नगरपंचायतीबाबत भूमिका मांडताना उबाठाचे तालुकाप्रमुख गुजर म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अपहार झालेले पैसे त्याच्याकडून वसूल करणे गरजेचे होते; मात्र ते न करता पक्षांतरानंतर ज्या नगरसेवकांनी अपहार उघड केला तेच आता निर्वाह भत्ता देण्यासाठी आग्रही आहेत. हे दुदैव असून, संबंधित कर्मचारी नगरपंचायतीमधील कंत्राटी कर्मचारी आहे. त्यामुळे त्याला निर्वाह भत्ता देणे गरजेचे आहे का, याचाही विचार झाला पाहिजे तसेच त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्वाह भत्ता देण्याविषयी औद्योगिक न्यायालयाचा निर्णय झाला आहे. त्याबाबत अपील होणे गरजेचे होते; मात्र नगरपंचायतीने तसे केले नाही, असे त्यांनी सांगितले.
चौकट
दापोली नगरपंचायतीत सफाई करणारे तसेच अन्य कर्मचारी जे सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना गेले चार महिने पगार दिला गेलेला नाही; मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी नगरसेवकांना निलंबित कंत्राटी कर्मचाऱ्याच्या निर्वाह भत्त्याची चिंता लागली आहे, अशी टीकाही गुजर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.