-पारंपरिक गणेशोत्सवाला मॉडर्न टच

-पारंपरिक गणेशोत्सवाला मॉडर्न टच

Published on

rat१६p१३.jpg-
P२५N८४६९१
खेड -खेड बाजारपेठेत गौरी-गणपती सणाच्यानिमित्ताने विक्रीसाठी आलेले गौराईंचे मुखवटे.

पारंपरिक गणेशोत्सवाला आधुनिकतेची जोड
मुखवटे, दागिने ठरताहेत लक्षवेधी ; बदलत्या काळाशी सुसंगत, बाजारपेठांनी स्वीकारला नवा ट्रेंड
सिद्धेश परशेट्ये : सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १६ : गौरी-गणपतीसारखे पारंपरिक सण साजरे करतानाही आता बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाजारपेठांनी नवा ट्रेंड स्वीकारला आहे. यंदाच्या गौरी-गणपती पूजेसाठी बाजारात पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्मार्ट तडका देणारे मुखवटे आणि दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पूर्वी लाकूड, मातीसारख्या पारंपरिक साहित्यांपासून बनवले जाणारे गौरीचे मुखवटे आता ‘पीओपी‘ आणि पेपरपल्पसारख्या हलक्या व पर्यावरणस्नेही साहित्यांपासून बनवले जात आहेत. विविध रंग, डिझाईन आणि पोत असलेले हे मुखवटे आता केवळ पूजेपुरतेच मर्यादित न राहता घरातील सजावटीचाही भाग होत आहेत. गौरीपूजेत वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्येही आता बदल जाणवतो. सोन्या-चांदीच्याऐवजी इमिटेशन ज्वेलरीला ग्राहकांचा जास्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक साजसुकाला आधुनिक डिझाईनची जोड देणारे हे दागिने अनेक प्रकारांत, आकारांत व किमतींमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाईन आणि सोशल मीडियावरूनही हे साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. आजच्या महिलांना पारंपरिकतेचा आदर राखूनही ट्रेंडी आणि बजेट-फ्रेंडली पर्याय हवाय. यामुळे सणासुदीला ‘फॅशन स्टेटमेंट‘ म्हणूनही पाहिले जात आहे. दरवर्षी नवनवीन डिझाईन बाजारात आणणारे छोटे व्यापारी, हस्तकला उत्पादक, ऑनलाइन विक्रेते यांची स्पर्धा वाढत चालली आहे.
पूर्वी मंदिर परिसरात किंवा स्थानिक कारागिरांकडून मिळणारे मुखवटे-दागिने आता मॉल्स, प्रदर्शनं, वेबसाइट्स आणि सोशल मीडियाद्वारे घरबसल्या उपलब्ध आहेत. यामुळे पारंपरिकतेसोबत तंत्रज्ञानाचा आणि ट्रेंडचा संगम साधला जात आहे. आजच्या घडीला पूजेला केवळ धार्मिकतेपुरती मर्यादा न राहता ‘फेस्टिव्ह क्रिएटिव्हिटी’ चा नवा चेहरा मिळालाय. पारंपरिक श्रद्धा, पर्यावरणपूरक साहित्य, आधुनिक फॅशन आणि डिजिटल खरेदी यांचे एकत्रित दर्शन यंदाच्या गौरीपूजेत पाहायला मिळणार आहे.
---
चौकट...
सजावटीच्या साहित्याच्या किमतीत ४० टक्के वाढ
गौरी-गणपतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड बाजारपेठेत आकर्षक सजावटीच्या वस्तू विक्रेत्यांनी आणल्या आहेत. वेगवेगळे गौरीचे मुखवटे हे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. गतवेळांपेक्षा या वेळी सजावट साहित्यांमध्ये ३० ते ४० टक्के किंमत वाढलेली आहे, अशी माहिती खेड बाजारपेठेतील विक्रेते विक्रांत गांधी यांनी दिली‌.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com