रत्नागिरी- अभ्यंकर बालमंदिरात बालगोविंदांची दहीहंडी

रत्नागिरी- अभ्यंकर बालमंदिरात बालगोविंदांची दहीहंडी

Published on

rat17p8.jpg-
84926
रत्नागिरी : आनंदीबाई अभ्यंकर बालविद्यामंदिरात दहीहंडी फोडताना बालगोपाळ.
अभ्यंकर बालमंदिरात
बालगोविंदांची दहीहंडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : येथील श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बाल विद्यामंदिरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या वेळी खेळघर, लहान शिशू व मोठ्या शिशूतील मुलांनी कृष्ण गीतांवर नृत्ये सादर केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद रत्नागिरीचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, सहायक कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे, विषय साधन व्यक्ती अश्विनी काणे उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व बालगोपाळांचे कौतुक केले. गोकुळाष्टमीनिमित्त सादर केलेल्या कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय सहभागाबद्दल आराध्य सनगरे विद्यार्थ्याचे कौतुक करून शाबासकी दिली. मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे व सर्व सहकारी शिक्षिका, सेविकांचे शैक्षणिक कामकाजाबद्दल विशेष प्रशंसा करून कौतुक केले. बालवाडीच्या माजी मुख्याध्यापिका मीना रिसबूड उपस्थित होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com