राजापूरचे ‘जय हनुमान खडपेवाडी’ एक लाखाचे मानकरी
85014
85015
सावंतवाडी ः जय हनुमान खडपेवाडी राजापूर संघाला रोख बक्षीस देऊन गौरविताना संदीप गाठनीवडे. दुसऱ्या छायाचित्रात थरावर थर रचून दहीहंडी फोडताना महापुरुष भटवाडी संघ.
राजापूरचे ‘जय हनुमान खडपेवाडी’ एक लाखाचे मानकरी
सावंतवाडीतील दहीहंडी उत्सव; युवा नेते संदीप गावडेंतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः युवा नेते संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये राजापूर येथील जय हनुमान खडपेवाडी गोविंदा पथक १ लाख ११ हजार १११ रुपयाचे मानकरी ठरले. कमीत कमी ४८ सेकंदात सात थर लावून या पथकाने सलामी दिली. रसिका प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अशा सात गोविंदा पथकांनी या दहीहंडीला हजर लावली.
श्री. गावडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव येथील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर शनिवारी (ता.१६) रात्री रंगला. सायंकाळी सुरू झालेला हा उत्सव रात्र उशिरापर्यंत सुरू होता. उत्सवाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदींच्या उपस्थितीत झाले. पालकमंत्री नीतेश राणे यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. यावेळी तब्बल सात दहीहंडी पथकांनी हजेरी लावत सलामी दिली. यामध्ये राजापूर येथील जय हनुमान खडपेवाडी गोविंदा पथकाने कमीत कमी ४८ सेकंदामध्ये सात थर लावून एक लाखाचे बक्षीस पटकावले. उत्सवाला महापुरुष भडवाडी सावंतवाडी, अमेय तेंडोलकर, सावंतवाडी, शिरुद्र परुळे, शिवगर्जना बांदा, जय हनुमान खडपेवाडी राजापूर, आडीवरे राजापूर, वरचीवाडी राजापूर अशा सात संघाने हजेरी लावत थर रचले. त्यांना प्रत्येकी ११ हजार १११ रुपये उत्तेजनार्थ बक्षीस दिले. महापुरुष भटवाडी संघाला दहीहंडी फोडण्याचा मान दिला. व्यासपीठावर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर, अनिकेत आसोलकर, सागर ढोकरे, चैतन्य सावंत आदी उपस्थित होते.
----------------
अभिनेत्री रिंकूची एन्ट्री अन् जल्लोष
दहीहंडीचा उत्साह उत्तरोत्तर वाढत असताना सैराट फिल्म सिने अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या एन्ट्रीने एकच जल्लोष केला. ‘कशे आसात, बरे आसात मा सावंतवाडीकरांनू, मराठीत सांगलेला कळत नाय, मालवणीत सांगू?’ असा डायलॉग मारत तिने उपस्थितांची मने जिंकली. श्री. गावडे यांच्यामुळे मला सावंतवाडीत येता आले. सावंतवाडीत येऊन आपल्या माणसांसोबत असल्यासारखे वाटले, असेही तिने यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.