स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये ध्वजवंदन
स्वरूपानंद विद्यामंदिरमध्ये
ध्वजवंदन
पावसः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस प्रशालेत प्राचार्य बाबासाहेब माने यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम झाला. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संतोष सामंत, माधव पालकर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. त्याचबरोबर प्रशालेमध्ये युनेस्कोच्या यादीत असलेले गडकिल्ले याविषयी व्याख्यानमाला आयोजित केली होती.
-----
उमरोली शाळेत
एक विद्यार्थी एक झाड
मंडणगड ः मागील सहा वर्षांपासून जिल्हा परिषद केंद्रशाळा उमरोली येथे स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. शुक्रवारी (ता. १५) जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेतून स्वराज्य प्रतिष्ठानने वृक्ष लागवड अभियान राबवले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक कुंडी आणि एक रोप भेट देण्यात आले. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्ष लागवड याची आवड आणि जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले. हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान उमरोलीचे निलेश मोरे, संदीप हुंबरे, अनंत मोरे तसेच शाळेचे शिक्षक प्रदीप कांबळे, मुख्याध्यापक श्री. कदम, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.