- विकसित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान हवेच

- विकसित भारतासाठी प्रत्येकाचे योगदान हवेच

Published on

-rat१७p४.jpg-
२५N८४९२२
आडिवरे : तावडे अतिथी भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे. सोबत दिनकर तावडे, संतोष तावडे, अतुल काळसेकर, बाळ माने आदी.
----
देशाच्या विकासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे
विनोद तावडे ः भक्त भवनाचा पहिला टप्पा पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : विकसित भारत होण्यासाठीची चर्चा प्रत्येक गावात व्हायला हवी. २०४७ मध्ये विकसित भारताच्या दृष्टीने प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय महासचिव व राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
तावडे अतिथी भवन येथे प्रथमच स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनानंतर विनोद तावडे बोलत होते. या वेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, सतीश तावडे, आर्किटेक्ट संतोष तावडे, राजेंद्र तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरपंच आरती मोगरकर, माजी आमदार बाळ माने, अतुल काळसेकर, शिल्पा मराठे, अॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते. श्री. तावडे म्हणाले, आडिवरे गावी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या तावडे मंडळींसाठी भक्त निवास व्हावे, असे ठरले आणि आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी अत्यंत कल्पकतेने इतकी सुरेख आणि देखणी वास्तू उभी केली. भवनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व त्यातून भविष्यात आडिवरे परिसरातले अर्थकारण बदलेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com