रत्नागिरी- शाळा, महाविद्यालय पातळीवर कथा लेखन स्पर्धा घ्या

रत्नागिरी- शाळा, महाविद्यालय पातळीवर कथा लेखन स्पर्धा घ्या

Published on

rat१७p१३.jpg-
८४९६२
रत्नागिरी : मसापतर्फे आयोजित प्र. ल. मयेकर स्मृती कथालेखन स्पर्धेतील विजेत्यांसह मागे उभे मंत्री उदय सामंत, प्रकाश देशपांडे, राजीव लिमये, अनिल दांडेकर व पदाधिकारी.
-----------

शाळा, महाविद्यालय पातळीवर
कथा लेखन स्पर्धा घ्याव्यात
मंत्री सामंत ; मसापतर्फे बक्षीस वितरण
रत्नागिरी, ता. १७ : युवा पिढीला कोकणातल्या साहित्यिकांच्या साहित्यातील ताकद काय आहे, याची ओळख महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून करून दिली पाहिजे. त्याना साहित्य आणि साहित्याचे विविध पैलू याची ओळख करून दिली पाहिजे. शालेय, महाविद्यालय पातळीवर अशा कथा लेखन स्पर्धेचे आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
मसाप रत्नागिरी शाखा व उदय सामंत प्रतिष्ठान यांच्यावतीने नाटककार (कै.) प्र. ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा आयोजित केली होती. बक्षीस विवेक हॉटेलमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मसाप कार्यकारिणी पदाधिकारी प्रकाश देशपांडे, लेखक राजीव लिमये, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, तसेच मसाप शाखेच्या अध्यक्ष शिल्पा सुर्वे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, सचिव अॅड. श्रीकांत भाटवडेकर, खजिनदार सतीश दळी, नितीन लिमये, दादा कदम, संजीव लिमये उपस्थित होते.
कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी प्रास्ताविकात मसापचा २०१३ पासूनचा इतिहास सांगितला. स्थापनेपासून मसापतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. रत्नागिरीत लेखकांची कमतरता नाही, सर्वांना जास्तीत जास्त लिहिते केले पाहिजे. कथा स्पर्धेतून खूप लेखक आले, असे सांगितले. यापुढे मसापतर्फे वाचक दिन, बालसाहित्य संमेलन यासारखे उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
------------
चौकट १
स्पर्धेचा सविस्तर निकाल
खुला गटात प्रथम- रविना घाणेकर (२००० रु), द्वितीय- विस्मया कुलकर्णी (१५०० रुपये), तृतीय- सायली शिर्के (१००० रुपये), उत्तेजनार्थ - राजेंद्रकुमार घाग, डॉ. प्रशांत शिरकर, दर्शना बापट (प्रत्येकी ५०० रू.). महाविद्यालयीन गट प्रथम - सोनिया शुक्ला (२००० रूपये), द्वितीय- निरंजन सावरे (१५०० रुपये), तृतीय- अनुष्का मांजरे (१००० रुपये) उत्तेजनार्थ - तृप्ती तोंडचिरकर, दीप्ती दोरखडे, वीणा काळे (प्रत्येकी ५०० रू.).

Marathi News Esakal
www.esakal.com