जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर
-rat१७p३४.jpg-
२५N८५०५३
राजापूर ः कुणबी समनोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीचे पदाधिकारी.
------------
कुणबी समन्वय समितीच्या
अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ : कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या नूतन अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. ही समन्वय समिती पाच वर्षाकरिता कार्यरत राहणार आहे.
बैठकीला शामराव पेजे न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण, रत्नागिरी शाखाध्यक्ष रामभाऊ गराटे, राजापूर ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक नागले, राजापूर शाखा मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर आदी उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी सुरेश भायजे, प्रकाश मांडवकर आणि वसंत घडशी यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर, सामंजस्याने झालेल्या चर्चेअंती श्री. घडशी यांनी माघार घेतल्याने श्री. भायजे आणि श्री. मांडवकर यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यामध्ये श्री. भायजेपेक्षा जास्त मताधिक्क्य मिळवून श्री. मांडवकर विजयी झाले. याप्रसंगी निवडण्यात आलेली अन्य कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष- वसंत घडशी (लांजा), नागेश धाडवे (खेड), शरदचंद्र गिते (रत्नागिरी), रवींद्र घाग (दापोली), सरचिटणीस-
नितीन लोकम (संगमेश्वर), सहचिटणीस- श्रीकांत मांडवकर (रत्नागिरी), रवींद्र कुळे (गुहागर), श्रीकांत राघव (राजापूर), संदीप खामकर, खजिनदार- सुधीर वैराग (खेड) यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.